Female Fan ला रिल्पाय देण्याच्या बदल्यात कार्तिक आर्यननं मागितले पैसे ? चाहतीला म्हणाला…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार कार्तिक आर्यन सध्या आपल्या करिअरच्या पिकवर आहे. त्याचे अनेक प्रोजेक्ट सुरू आहेत ज्यामध्ये सध्या तो व्यस्त आहे. याशिवाय कार्तिक आपल्या स्टाईल आणि चार्मिंग पर्सनॅलिटीसाठी ओळखला जातो. त्याची फॅन फॉलोविंगही मोठी आहे. अलीकडेच त्यानं एका चाहतीला दिलेला रिप्लाय चर्चेत आला आहे.

कार्तिकनं नुकताच त्याच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. फोटो पाहून चाहत्यांनी त्याचं कौतुक करायला सुरुवात केली. अशात एका मुलीनं त्याच्या फोटोवर अशी कमेंट केली की, ती वाचून कार्तिकनंही तिला रिप्लाय दिला. फोटोवर कमेंट करत रिप्लायसाठी विनंती करत एक मुलगी म्हणाली, “भाई मी तुला एक लाख देईल तुझ्या बहिणीला रिप्लाय दे यार.” यावर कार्तिकनं मजेशीर उत्तर देत कमेंट केली. कार्तिक म्हणाला, “हा घे रिप्लाय. कुठे आहेत पैसे ?”

कार्तिकनं शेअर केलेला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. याशिवाय त्यानं त्या मुलीला दिलेला रिप्लायदेखील चर्चेत आला आहे. कार्तिकचे चाहते या फोटोवर आणि त्या मुलीच्या कमेंटवरही रिप्लाय करताना दिसत आहेत. अनेकांनी तिला विचारलं आहे की, कार्तिक आर्यनला पैसे पाठवले की नाही अजून. एकानं म्हटलं आहे की, बोलून रिप्लाय मागत असशील तर आयुष्यभर मिळणार नाही.”

कार्तिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो भूल भुलैया 2 या सिनेमात दिसणार आहे. सध्या कार्तिक या सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय कार्तिक दोस्ताना 2 या सिनेमातही झळकणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत जान्हवी कपूर प्रमुख भूमिकेत असणार आहे.