लवकरच सुरू होणार कार्तिक आर्यनच्या ‘धमाका’ची शूटिंग ! विनोदी पोस्ट शेअर करत दिली माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरस लॉकडाउननंतर सिनेमा हॉल सुरू झाले आहेत. हळूहळू स्टार्स सिनेमांच्या शूटिंगला सुरुवात करताना दिसत आहेत. बॉलिवूड स्टार कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) देखील लवकरच धमाका या त्याच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. खूप विनोदी अंदाजात त्यानं याचा खुलासा केला आहे. त्यानं अलीकडेच त्याच्या वाढदिवसानिमित्त सिनेमाची घोषणा केली होती.

कार्तिकनं त्याच्या इंस्टावरून एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याचा फोटोही दिसत आहे. असं वाटत आहे त्यानं नुकतंच तोंड धुतलं आहे. या पोस्ट कार्तिकनं लिहिलं की, तोंड-हात धुऊन.. धमाका सुरू करूयात.. पुढील आठवड्यापासून.

धमाका सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर राम माधवानी या सिनेमाचं डायरेक्शन करणार आहेत. कार्तिकनं सिनेमाचं पहिलं मोशन पोस्टरही शेअर केलं होतं. पुढील आठवड्यापासून आता सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होत आहे.

कार्तिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर लवकरच तो भूल भुलैया 2 या सिनेमात दिसणार आहे. याशिवाय कार्तिक दोस्ताना 2 या सिनेमातही झळकणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री जान्हवी कपूर प्रमुख भूमिकेत असणार आहे. या सिनेमाच्या निमित्तानं दोघं पहिल्यांदात एकत्र काम करताना दिसणार आहेत. इतकंच नाही तर तान्हाजी सिनेमाचे डायरेक्टर ओम राऊतसबोतही तो एक सिनेमात काम करत आहे.