‘जनता कर्फ्यु’च्या दिवशी थाळी वाजवणारी अभिनेत्री कॅटरीना कैफ प्रचंड ट्रोल ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – रविवारी(दि 22 मार्च 2020) देशात जनता कर्फ्यु होता. या दिवशी सायंकाळी 5 वाजता कोरोना कमांडोंसाठी थाळी किंवा टाळ्या वाजवाव्यात असं अपील पंतप्रधान नरेंद्र मोंदींनी केलं होतं. सामान्यांसोबत सेलिब्रिटींनीही टाळ्या आणि थाळ्या वाजवल्या. यानंतर अनेकांचे व्हिडीओदेखील समोर आले आहे जे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. चाहत्यांनी अनेकांचं कौतुक केलं. परंतु काहीजण मात्र ट्रोल होताना दिसले. अभिनेत्री कॅटरीना कैफसोबत असंच काहीसं होताना दिसलं.

कॅटरीना कैफनं तिचा थाळी वाजवतानाचा व्हिडीओ तिच्या इंस्टावरून शेअर केला होता. व्हिडीओत आहे की, कॅट घराच्या छतावर आहे आणि चमच्यानं थाळी वाजवत आहे. तसं तर थाळी वाजवण्याचा आवाज तर येत आहे परंतु ती उत्साहात थाळी वाजवताना दिसत नाही. म्हणजेच खूप हलक्या हातानं थाळी वाजवताना दिसते. सोबत तिच्या हातात थाळी नसून एक स्टीलची चाळण आहे असंही दिसत आहे.

कॅटचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल होताना दिसत आहे. इतकंच नाही तर अनेकांनी तिच्यावर टीका करत तिला ट्रोल केलं आहे. काहींनी तिला चक्क ओव्हर अ‍ॅक्टींग म्हटलं आहे. एकानं कमेंट केली की, दीदी एवढी मेहनत करण्याची काय गरज होती. एकानं तिची खिल्ली उडवत म्हटलं की, हे पाहून कोरोना चीनला परत चालला आहे. एकानं तर तिच्यावर अ‍ॅक्टींगवरूनच निशाणा साधला आहे. त्यानं म्हटलं आहे की, हे कामही तू अ‍ॅक्टींगप्रणाणेच केलं आहेस.

https://www.instagram.com/p/B9zRFbapPUj/

कॅटरीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायाचं झालं तर लवकरच ती सूर्यवंशी सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा 24 मार्च 2020 रोजी रिलीज होणार होता. परंतु कोरोनामुळं सिनेमाची रिलीज डेट टाळण्यात आली आहे.

https://www.instagram.com/p/B9xCRXiHRun/

https://www.instagram.com/p/B9vtOICJLdQ/

https://www.instagram.com/p/B8t5zQJBwH3/

https://www.instagram.com/p/B90OPjth8ZN/

https://www.instagram.com/p/B9zhsKWBNBp/

https://www.instagram.com/p/B9zRCfCpFgm/

https://www.instagram.com/p/B9zQ5PPpgtt/