‘ते’ फोटो ‘लिक’ झाल्यानं कॅटरीनाचं रणबीर कपूरची पत्नी बनण्याचं स्वप्न ‘भंगलं’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार कॅटरीना कैफने अनेकदा सांगितले आहे की, रणबीर कपूर सोबत तिचे ब्रेकअप झाल्यानंतरचा काळ तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता. तिने सांगितले होते की, हे नाते तुटल्यानंतर ती खूप त्रासात होती. सध्या रणबीर कपूर आणि कॅटरीना कैफ त्यांच्या आयुष्यात खूप पुढे निघून गेले आहेत. रणबीर कपूरने मम्मी पप्पांचं घर सोडून कॅटरीनासोबत राहण्यासाठी वेगळा प्लॅट घेतला होता. दोघे सोबत रहातही होते. दोघांनीही एकमेकांच्या कुटुंबियांना नातेवाईक मानले होते. आज कॅट आपला ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे.

image.png

कपूर कुटंबियांच्या प्रत्येक फंक्शनमध्ये कॅटचा सहभाग

कॅटरीना कैफ कपूर कुटुंबियात इतकी मिसळली होती की, कपूर कुटुंबियांसोबत सर्व मोठ्या कार्यक्रमात सहभागी होती. याशिवाय कॉफी विद करणमध्ये करीना कपूर म्हटली होती की, ती कॅटरीनाला वहिनीच्या रुपात पाहू इच्छित आहे.

image.png

नीतू कपूर यांनीही दिला होता ‘ग्रीन सिग्नल’

जर एखादी मुलगी रणबीर सोबत नात्यात आली तर नीतू कपूर यांनी ग्रीन सिग्नल दिल्याशिवाय नाते पुढे जात नाही असे बी टाऊन मधील प्रत्येकजण बोलताना दिसत आहे. कॅटबद्दलही असंच होतं. असे सांगितले जात आहे की, दीपिका पादुकोणला घेऊन नीतू कपूर रणबीरच्या बाजूने नव्हत्या. असे सांगितले जात आहे की, सुरुवातीच्या काळात कॅटरीना कैफबाबतही असेच होते. नंतर मात्र कॅटने दोन्ही कुटुंबांची समजूत काढली होती. यानंतर नीतू कपूर यांनीही तिला ग्रीन सिग्नल दिला होता.

सलमान खानला नाराज करत रणबीरसोबत गेली होती कॅटरीना कैफ

सलमान खानने कोणत्याही मुलीबाबत इतके खुलून नव्हते सांगितले की, जेवढं खुलून त्याने कॅटरीनाला घेऊन संसार थाटण्याबद्दल बोलले होते. केवळ सलमान खानची बहिण अर्पिताचं लग्न होण्याचा उशीर होता. सलमान खान माईकवर बोलताना सगळे मित्र आणि मोठ्या लोकांसमोर म्हणाला होता की, “मी कॅटरीना कैफला ‘कॅटरीना कैफ खान’ बनण्यासाठी संधी दिली होती. परंतु तिला मात्र ‘कॅटरीना कैफ कपूर’ बनायचे आहे.” यानंतर यावेळी कॅटरीनाने सलमान मागे लपण्याचा प्रयत्न केला होता.

‘ते’ फोटो लीक झाल्याने कपूर कुटुंबियांची सून होण्याचे कॅटचे स्वप्न तुटले

रणबीर आणि कॅटरीना कैफचा २००९ साली आलेला ‘अजब प्रेम की गजब कहानी’ या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यानच दोघांमधील जवळकीता वाढताना दिसत होती. रिलेशनला जवळपास चार वर्षे झाली होती. २०१३ साली अचानक रणबीर आणि कॅटचे फोटो व्हायरल होताना दिसून आले. स्पेनमधील एका समु्द्रकिनाऱ्यावरील हे फोटो होते. या फोटोंनी दोघांच्या नात्यात दरी आली. पाहता पाहता कपूर कुटुंब कॅटरीनाच्या विरोधात उभं राहिलं.

यानंतर कॅटने आपले खासगी फोटो छापल्यामुळे बॉम्बे टाईम्सला नोटीस पाठवली. याशिवाय इतरही अनेक प्रकाशकांना नोटीस पाठवली होती. तिने सांगितले की, हे माझे खासगी फोटो आहेत ते प्रकाशित करू नका. हे फोटो काढले कोणी आणि मीडियापर्यंत पोहोचवले कोणी यावर मात्र रणबीर खुलून बोलला नाही. परंतु असे म्हटले जात आहे की, कॅटच्या निष्काळजीपणामुळे हे फोटो लीक झाले होते.

आरोग्यविषयक वृत्त

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने

 

Loading...
You might also like