Photos : बॉलिवूडची ‘कॅट’ बिकीनीत दिसते 12 वर्षांची मुलगी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन  – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस कॅटरीना कैफ सध्या मेक्सिकोमध्ये सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहे. तिच्या व्हॅकेशनचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत कॅट खूपच स्मार्ट दिसत आहे. तिने मल्टिकलर बिकीनी घातली आहे. कॅटच्या या फोटोची चाहते मोठ्या प्रमाणावर स्तुती करत आहेत. अनेक सेलेब्रिटीही कॅटच्या स्टाईलने इम्प्रेस झाले आहेत. कॅटचा फोटो त्यांनाही खूप भावला आहे.

मनीष मल्होत्रानेही कॅटच्या फोटोवर दोन हार्ट शो करत स्तुती केली होती. फराह खान तर कॅटला 12 वर्षांची मुलगीच म्हणाली. फराहने लिहिले की, “या फोटोत तू 12 वर्षांची मुलगीच दिसत आहेस. सो स्वीट.” याशिवाय कॅटच्या फोटोवर कमेंट करत जोया अख्तरने लिहिले की, “आनंदी मुली सर्वात सुंदर मुली असतात.” मिनी माथुरने लिहिले की, “तू इथे खूपच खुश दिसत आहेस.”

आता सेलेब्रिटींव्यतिरीक्त चाहत्यांबद्दल बोलायचे झाले तर, एका चाहत्याने म्हटले की, “मॅम तुमची एक स्माईल बघून माझा पूर्ण दिवस आनंदात जातो. माय लव्ह.” लक्षिता पाठक म्हणाली की, “अप्रितम सौंदर्य.” नगहम म्हणते की, “तुम्ही नेहमी असेच खुश रहा. आम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील ही स्माईल खूपच सुंदर वाटते. आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे.”  कॅटच्या आणखी एका चाहत्याने लिहिले की, “फक्त कॅटरीना कैफच बीच साईड फोटोंमध्ये सुंदर दिसू शकते. नेहमीच अशीच पुढे जात रहा.

कॅटरीनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, लवकरच ती रोहित शेट्टीच्या सुर्यवंशी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती खिलाडी अक्षय कुमार सोबत दिसणार आहे. 2020 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.