Photos: कोणाच्या छातीवर डोकं ठेवून झोपली कॅटरीना कैफ ? जेम्स बाँड बनून चाहत्यांनी पकडली अभिनेत्रीची चोरी !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड ॲक्ट्रेस कॅटरीना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या नात्याची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा होताना दिसत आहे. असं म्हटलं जात आहे की, दोघं एकमेकांना डेट करत आहेत. परंतु दोघांनीही अद्याप नात्यावर काही भाष्य केलेलं नाही. दोघांनीही जरी मौन धारण केलेलं असलं तरी अनेकदा ते एकत्र स्पॉट होताना दिसत असतात. न्यू ईयरच्या निमित्तानंही कॅटरीनानं एक फोटो शेअर केला होता. ज्यात मागे असलेल्या आरशात विकी कौशलचं रिफ्लेक्शन दिसलं होतं. पुन्हा एकदा तिनं असा फोटो शेअर केला आहे ज्यामुळं त्यांच्या डेटींगच्या बातम्यांनी जोर धरला आहे. इतकंच नाही तर चाहत्यांनीच जेम्स बाँड बनून या मिस्ट्री मॅनचा शोध लावला आहे आणि तिची प्यारवाली चोरी पकडली आहे.

कॅटरीनानं तिच्या इंस्टा स्टोरीला एक फोटो शेअर केला आहे. यात अनेक फुलपाखरं दिसत आहेत. कॅटरीना सोबत या फोटो आणखी एक जण दिसत आहे. त्याचा चेहरा मात्र फोटोत दिसत नाही. चाहत्यांचं तर असं म्हणणं आहे की, कॅटरीना कैफनं या फोटोत विकीलाच हग केलं आहे. इतकंच नाही तर त्यांनी तसा पुरावाही दिला आहे.

कॅटरीनानं जो फोटो शेअर केला आहे त्यात तोंड न दिसणाऱ्या व्यक्तीनं मस्टर्ड कलरचा टीशर्ट घातला आहे ज्याला ती हग करत आहे. त्यामुळं आता असा अंदाज लावला जात आहे की, फोटोत दिसणारा व्यक्ती दुसरा तिसरा कुणी नसून विकी कौशलच आहे. काहींनी तर त्यांच्या फोटोचं कोलाज करून एक फोटो शेअर केला आहे आणि पुराव्यासहित सांगितलं आहे की, हा विकीच आहे.

कॅटरीनानं शेअर केलेला फोट पाहून लोक विकीच्या प्रोईफलचा तपास करू लागले. आणि त्यांना विकीच्या प्रोईलवर त्याच रंगाचा शर्ट घातलेला फोटो मिळाला जो कॅटरीनाच्या फोटोत त्या माणसानं घातला आहे.

https://www.instagram.com/p/CKks2Lthbgt/?utm_source=ig_embed

कॅटरीनाचा हा फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल झाला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांनी तिच्या या लुकचंही कौतुक केलं आहे. जास्तीत जास्त लोकांनी असा दावा केला होता की, कॅटरीना ज्याला हग करत आहे तो विकी कौशलच आहे. अनेकांनी ही बाब समोर आल्यानंतर तशा पोस्टही शेअर केल्या आहेत.

कॅटरीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायाचं झालं तर लवकरच ती सूर्यवंशी सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा 24 मार्च 2020 रोजी रिलीज होणार होता. परंतु कोरोनामुळं सिनेमाची रिलीज डेट टाळण्यात आली आहे. या सिनेमात ती अक्षय कुमार सोबत दिसणार आहे. या सिनेमाच्या निमित्तानं ती रोहित शेट्टीसोबत पहिल्यांदाच काम करत आहे. याशिवाय तिनं डायरेक्टर विकास बहलचा डेडली हा सिनेमा साईन केल्याचंही बोललं जात आहे. आता 2021 मध्ये ती फोन भूत या सिनेमातही दिसणार आहे.