अभिनेत्री कॅटरीनाचे बिना मेकअपचे फोटो व्हायरल

मुंबई : वृत्तसंस्था – बॉलीवूड अभिनेत्री नेहमीच फुल मेकअप आणि नवीन स्टाइल यांना पसंती देताना दिसून येतात. मात्र काही अशाही अभिनेत्री आहेत ज्यांना सिंपल लूकमध्येही पाहण्यासाठी चाहते अतिउत्सुक असतात. बॉलीवूड इंडस्ट्रीची ‘बार्बी डॉल’ म्हणून ओळखली जाणारी कॅटरिना कैफच्या बाबतीत सध्या असे काही घडताना दिसत आहे. नुकतीच कॅटरिना विमानतळावर बिना मेकअपची दिसली. तिच्या या कॅज्युअल लूकमध्येही ती इतकी सुंदर दिसत होती की तिच्या फॅन्सची तिच्यावरून नजर हटत नव्हती.

लवकरच कॅटरीना रोहित शेट्टी याच्या ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती अक्षय कुमारच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. यापूर्वी कॅटरीना खिलाडी अक्षय कुमारसोबत तीस मार खान , दे दना दन, वेलकम या चित्रपटात दिसली होती. अक्षय आणि कॅटरीनाची जोडी चित्रपटामध्ये नेहमीच हिट राहिलेली आहे. २७ मार्च २०२० ला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

सध्या, कॅटरीना ‘भारत’ चित्रपटाला मिळालेले यश साजरे करत आहे. सलमानसोबत असणारा तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणकेबाज कमाई करत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने २५० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. ‘भारत’ हा चित्रपट अली अब्बास जफर आणि सलमान खान या जोडीचा तिसरा सुपरहिट चित्रपट आहे. यापूर्वी ‘टाइगर जिंदा है’ आणि ‘सुल्तान चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले आहे. अली अब्बास सोबतच सलमान आणि कॅटरीनाची जोडी प्रेक्षकांना नेहमीच आकर्षित करण्यात यशस्वी राहिलेली आहे.

https://www.instagram.com/p/ByDEUU4ByVQ/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/BvmaPrUA0bn/?utm_source=ig_web_copy_link

आरोग्य विषयक वृत्त – 

“उपवास” हा आरोग्यासाठी फायदेशीर मात्र या लोकांसाठी घातक 

स्लीपर चप्पल पायांसाठी वेदनादायी

वारंवार लघवीला येत असेल तर करा ‘हे’ उपाय 

ही “योगासन” करतील मासिक पाळीतील आजारांवर नियंत्रण

Loading...
You might also like