रणबीर कपूरसोबतच्या ‘ब्रेकअप’वर कॅटरीना कैफनं सोडलं ‘मौन’ ! म्हणाली…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस कॅटरीना कैफचं रणबीर कपूर सोबत ब्रेकअप झाल्यानंतर डिप्रेशनमध्ये गेली होती. मोठ्या मुश्किलीनं ती यातून बाहेर आली आहे. या काळात तिला सलमान खानचीही खूप मदत झाली आहे. तिचं लक्ष हटवण्यासाठी सलमाननं तिला भारत सिनेमात कामही दिलं. असंही म्हटलं जात आहे की अभिनेता विकी कौशल आणि कॅटचं झेंगाट सुरू आहे. कॅटनं दोन वेळा ब्रेकअपचा त्रास सहन केला आहे. एकदा सलमान सोबतच्या ब्रेकअपचा आणि एकदा रणबीरसोबतच्या ब्रेकअपचा. कॅटनं आता तिच्या ब्रेकअपवर भाष्य केलं आहे.

‘ते माझ्या कंट्रोलमध्ये नव्हतं’

एका मुलाखतीत बोलताना कॅटरीना कैफ म्हणाली, “आत मी सांगेल की, माझं आयुष्य 80 टक्के काम आणि 20 टक्के खासगी आयुष्यावर केंद्रीत आहे. परंतु हे आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये. आता खूप काम होत आहे. जेव्हा माझं खासगी आयुष्य उध्वस्त झालं तेव्हा ते माझ्या कंट्रोलमध्ये नव्हतं.

‘जणू काही माझं आयुष्य संपलं होतं’

कॅटरीना कैफ म्हणते, “वास्तविक पाहता हे जाणून घेणं अवघड असतं की, हे का घडलं आहे. परंतु मी यावर वेगळा विचार करते. ठिके. हे (ब्रेकअप) बेकार आहे, भयानक आहे. जगातील सर्वात वाईट गोष्ट आहे. जणू काही माझं आयुष्य संपलं होतं. 2 मिनिटांसाठी यावर विश्वास ठेवणं शक्य नाही. परंतु जर तुमचा देवावर विश्वास असेल तर तुम्हाला चांगलं वाटेल.”

‘तुम्ही याच्या पुढे जायला हवं’

कॅटरीना असंही म्हणाली, “मला ऐकणाऱ्या युवतींना मला सांगायचं आहे की, त्यांना असं काही मिळू शकतं जे त्यांची मदत करेल. ते एका व्यक्तीला पाहू शकतात, विचार करू शकतात त्यांना तसा संघर्ष करावा लागत नाहीये जसा मी करत आहे. तसं तर प्रत्येकजण संघर्ष करत असतो. महत्त्वाचं काय आहे तर ते म्हणजे शिकणं. तुम्ही याच्या पुढे जायला हवं.

लॉकडाऊनमध्ये घरात असणारी सर्व कलाकार मंडळी सोशलवर अॅक्टीव दिसत आहेत. फोटो किंवा व्हिडीओ किंवा एखादी पोस्ट शेअर करत ते चाहत्यांशी संपर्क साधताना दिसत आहेत. अलीकडेच अभिनेत्री कॅटरीना कैफ आपल्या एक पोस्टमुळं चर्चेत आली होती. तिचा समुद्रातील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.

कॅटरीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायाचं झालं तर लवकरच ती सूर्यवंशी सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा 24 मार्च 2020 रोजी रिलीज होणार होता. परंतु कोरोनामुळं सिनेमाची रिलीज डेट टाळण्यात आली आहे. या सिनेमात ती अक्षय कुमार सोबत दिसणार आहे. या सिनेमाच्या निमित्तानं ती रोहित शेट्टीसोबत ती पहिल्यांदाच काम करत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like