बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी कतरिना कैफची बहीण इसाबेल कैफ तयार, समोर आला ‘सुस्वागतम खुशमदीद’ चा फर्स्ट लूक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमार आणि अजय देवगण सोबत अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, कतरिना कैफ सोबत तिची बहीण इसाबेल कैफही हिंदी चित्रपटसृष्टीत आपली इनिंग सुरू करणार आहे. ‘सुस्वागतम खुशमदीद’ या चित्रपटाद्वारे इसाबेल बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. या चित्रपटात ती पुलकित सम्राटसोबत रोमांस करताना दिसेल.

पुलकितने चित्रपटाचा फस्ट लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. पुलकितने या फोटोंसह लिहिले- नमस्ते- आदाब. आता लवकरच होणार आपली भेट. ‘सुस्वागतम् खुशमदीद’चा फस्ट लूक हाजीर!’. दरम्यान, या चित्रपटामध्ये पुलकित अमर नावाची भूमिका करत आहे, जो दिल्लीचा आहे. तर इसाबेलच्या पात्राचे नाव नूर आहे, जी आग्र्याची आहे. पुलकितच्या फोटोजवर कतरिना कैफनेही प्रतिक्रिया दिली. ‘सुसगागम खुशमदीद’ चे दिग्दर्शन धीरज कुमारने केले आहे. हे फोटो चित्रपटाच्या गाण्याचे आहेत. तसेच पुलकितने यापूर्वी एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये इसाबेलचा चेहरा दिसत नव्हता. पुलकितने या फोटोसह लिहिले- तुम्ही माझ्या सह-कलाकारास ओळखू शकता का?

दरम्यान, इसाबेल यापूर्वी माशाल्लाह या एका म्युझिक व्हिडिओमध्येही दिसली आहे. इसाबेल आता हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे, पण चित्रपटांमधील तिची कारकिर्द डॉ. कॅबी पासून सुरु झाली होती. 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची निर्मिती सलमान खानने केली होती. डॉ. कॅबीमध्ये इसाबेल कुणाल अय्यरच्या अपोजिट होती. विनय विरमानीने यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

इसाबेलसंदर्भात आणखी दोन बॉलिवूड चित्रपटांची घोषणा झाली. एकाची निर्मिती सलमान खान करत असून त्याचा जीजा आयुष शर्मा यात मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाचे टायटल क्वाथा आहे. याशिवाय इजाबेल सूरज पंचोलीसमवेत टाईम टू डान्समध्येही दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसोझाच्या सहाय्यक स्टेनली डायकोस्टाने केले आहे. दरम्यान, इसाबेल कैफ सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव असते आणि बर्‍याचदा तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करते. तिचे 8 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.