Video : कॅटरिना कैफने चाहत्यांच्या गर्दीला ‘अशाप्रकारे’ केले हॅंडल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कॅटरिना कैफ नुकतिच दिल्ली एयरपोर्टवर स्पॉट झाली. ती बॉडीगार्डसोबत होती तरीदेखील कॅटरिनाला पाहताच तिच्या चाहत्यांनी तिला घेरले आणि सेल्फी घ्यायला लागले. सेल्फी घेता-घेता चाहते तिच्या खूप जवळ जाऊ लागले. करिना तेव्हा खूप संतापली. त्याच दरम्यान कॅटरिनाचा बॉडीगार्ड चाहत्यांना लांब करण्याचा प्रयत्न करीत होता.

तेव्हा कॅटरिना बोट दाखवत म्हणाली, ‘शांततेने लांबून सेल्फी घ्या.’ कॅटरिनाने सांगून देखील चाहते ऐकायला तयार नव्हते. तेव्हा एका चाहत्याबरोबर बॉडीगार्डची धक्का-बुक्की झाली. कॅटरिनाचा चाहत्यांसोबत सेल्फी घेतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे. युजर्स ही तिला सपोर्ट करत आहे.

एका यूजने लिहले की, ‘आपल्या फेवरेट स्टारला पाहून उत्साहित होणे स्वाभाविक आहे पण सेल्फी घेण्यासाठी तिच्या इतक्या जवळ जाणे ठिक नाही. कॅटरिनाने या परिस्थितीला चांगल्याप्रकारे हॅंडल केले आहे.’, दुसऱ्या युजर्सने लिहले की, ‘ती एक माणूस आहे. तिचीपण खाजगी लाइफ आहे. आपण त्यांचा आदर केला पाहिजे.’

ही पहिली वेळ नाही की चाहत्यांनी तिला घेरले. ‘तीस मार खां’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानसुद्धा ती चाहत्यांच्या गर्दीमध्ये सापडली होती. चाहते तिला जबरदस्तीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करित होते. तेव्हा अक्षय कुमारने रेस्क्यू केले होते. त्याने कॅटरिनाला आपल्या हाताने घेरले होते आणि तेथून बाहेर पडला होता.

सध्या कॅटरिना आगामी चित्रपट ‘सूर्यवंशी’ ची शूटिंग करत आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत अक्षय कुमार दिसणार आहे. हा चित्रपट रोहित शेट्टीने डायरेक्ट केला आहे. चित्रपटामध्ये अक्षय कुमारचा चित्रपट ‘मोहरा’ मधील ‘टिप टिप बरसा पानी’ गाणे रीक्रिएट केले जाणार आहे. काही दिवसांपुर्वी अक्षय आणि कॅटरिनाने या गाण्याचे शूट पुर्ण केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

तुम्ही खात असलेले अन्न हे शरीर व मनासाठी आरोग्यवर्धक आहे का ?

पावसाळ्यात येणारी ‘ही’ भाजी आहे सर्वात पौष्टिक ; खा आणि रोगमुक्त व्हा

रक्त शुद्ध करण्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन करा

सिनेजगत

मुंबईतील पावसाचा बॉलिवूडवर देखील ‘इम्पॅक्ट’, ‘या’ चित्रपटासह इतरांना ‘फटका’

जायरा वसीमसारखे अजिबात नाहीत ‘या’ ‘टॉप’ ४ बालिवूड अभिनेत्रींचे ‘विचार’

Video : अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत ‘बोल्ड’ सीन करताना ‘हा’ अभिनेता ‘आऊट ऑफ कंट्रोल’ !

बहुजननामा

अनुसूचित जातीमध्ये १७ ओबीसी जाती समाविष्ट करण्याचा योगी सरकारचा निर्णय बेकायदा

आगामी विधानसभेसाठी वंचित-काँग्रेस एकत्र आल्यास समीकरणे बदलतील

शहरातील सर्व बांधकामे तातडीने थांबवा – बाबा आढाव