फक्त ‘त्याच्या’साठी कॅटरीना कैफनं रॅम्पवर वधूसारखा जलवा दाखवला (PHOTOS)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लॅक्मे फॅशन विक 2019 च्या विंटर फॉल एडिशनला सुरुवात झाली आहे. या निमित्ताने अनेक स्टार्स रॅम्प वॉकसाठी उतरले आहेत. परंतु कॅटरीना कैफने तर कमालच केली आहे. कॅट डिझाईनर मनीष मल्होत्रासाठी शो स्टॉपर म्हणून रॅम्पसवर आली.

शोसाठी शो स्टॉपर बनलेल्या कॅटचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. अ‍ॅथनिक लुकमध्ये कॅट खूपच शानदार दिसत होती. डिझाईनर पीसने कॅटच्या लुकला चार चांद लावले होते.

कॅटने ब्लॅक कलरचा लेहंगा घातला होता. यावर गोल्डन कलरचं भरतकाम होतं. हा लेहंगा ट्रॅडिशनल डिझाईनचा होता. परंतु कॅटने घातलेल्या ब्लाऊजमध्ये स्टाईलचा पंच होता. ज्यामुळे पू्र्ण लुक अधिकच सुंदर दिसत होता.

कॅटरीनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, सध्या ती सुर्यवंशी या आगामी सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात ती अक्षय कुमार सोबत दिसणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित हा सिनेमा सिंघम सिनेमाची सीरीज आहे.

सुर्यवंशीच्या आधी कॅटरीना कैफ भारत सिनेमात झळकली होती. यात ती सलमान सोबत दिसली होती. जूनमध्ये ईदच्या निमित्ताने हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like