कॅटरीना कैफ घेऊन येतेय ‘हॉरर’ कॉमेडी ‘फोन बूथ’ ! सोबत दिसणार ईशान खट्टर

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  अभिनेत्री कॅटरीना कैफ हिच्या आगामी सिनेमाची नुकतीच घोषणा झाली आहे. फोन बूथं असं या सिनेमाचं नाव आहे. सिनेमात कॅटरीना कैफ आणि ईशान खट्टर ही जोडी दिसणार आहे. गली बॉय सिनेमात रॅपरचा रोल करणारा अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी हाही या सिनेमात दिसणार आहे.

एक्सल मुव्हीनं इंस्टावरून एक पोस्ट शेअर करत सिनेमाची घोषणा केली आहे. सिनेमाचं पोस्टर शेअर करत एक्सल मुव्हीनं लिहिलं की, जोपर्यंत तुम्ही हसत रहाल तोपर्यंत घाबरण्याची परवानगी नाहीये. 2021 मध्ये सिनेमा हॉलमध्ये फोन बूथ हा सिनेमा येत आहे.

समोर आलेल्या पोस्टरमध्ये ईशान, कॅटरीना आणि सिद्धांत तिघंही ब्लॅक सूटमध्ये दिसत आहेत. तिघही धावण्याच्या तयारीत असल्यासारखे वाटत आहेत. सध्या हे पोस्टर व्हायरल होत असून याची खूप चर्चा होत आहे.

एक्सलच्या व्यतिरीक्त कॅटरीना कैफ, ईशान खट्टर, सिद्धांत चतुर्वेदी अशा तिघांनीही इंस्टावरून सिनेमाचं हे पोस्टर शेअर केलं आहे. तिघांनीही वेगवेगळं कॅप्शन दिलं आहे. सिनेमाच्या डायरेक्शनबद्दल बोलायचं झालं तर गुरमीत सिंह हे या सिनेमाचं डायरेक्शन करत आहेत.

कॅटरीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायाचं झालं तर लवकरच ती सूर्यवंशी सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा 24 मार्च 2020 रोजी रिलीज होणार होता. परंतु कोरोनामुळं सिनेमाची रिलीज डेट टाळण्यात आली आहे. या सिनेमात ती अक्षय कुमार सोबत दिसणार आहे. या सिनेमाच्या निमित्तानं ती रोहित शेट्टीसोबत पहिल्यांदाच काम करत आहे. याशिवाय तिनं डायरेक्टर विकास बहलचा डेडली हा सिनेमा साईन केल्याचंही बोललं जात आहे. आता 2021 मध्ये ती फोन बूथ या सिनेमातही दिसणार आहे.

https://www.instagram.com/p/CC2ivHbjf7B/?utm_source=ig_embed