KBC 12 : ज्यावेळी ‘बिग बी’ अमिताभनं क्रिकेट क्लबच्या मेंबरशिपसाठी आईकडे मागितले होते 2 रूपये, मिळालं होतं हे उत्तर

पोलीसनामा ऑनलाइन टीम : सोनी टीव्ही वरील लोकप्रिय असलेला शो ‘कौन बनेगा करोडपती’ चा 12 वा सीझन सुरू झाला आहे. शो सुरू होताच प्रेक्षकांची क्रेझ वाढत आहे. केबीसी12 तील आजची ह प्रथम स्पर्धक आरती जगतापने 6 लाख, 40 हजार जिंकले. दुसरा स्पर्धक सोनू कुमारने 12 लाख, 40 हजार रुपये जिंकले आहेत. त्याचवेळी शोचा तिसरा स्पर्धक म्हणजे जय कुलश्रेष्ठ. मंगळवारी जय यांनी सात प्रश्नांची उत्तरे देऊन 40 हजार रुपये जिंकले.

शोमध्ये बिग बी प्रश्नांमधील आपल्या वैयक्तिक आणि स्पर्धेच्या वैयक्तिक गोष्टी शेअर करताना नेहमीच दिसत असतात. यादरम्यान जयने आपल्या बालपणातील एक किस्सा सांगितला, जो ऐकल्यावर अमिताभ बच्चन देखील थोडे भावूक झाले. त्याचवेळी बिग बीने आपल्या बालपणातील किस्साही शेअर केला. अमिताभ बच्चन यांनी आपल्या बालपणीची कहाणी सांगत म्हटले की, एकदा मी जेव्हा वयाने लहान होतो तेव्हा आईला क्रिकेट क्लबचे सदस्य होण्यासाठी दोन रूपये मागितले होते.

त्यावेळी पैसे नसल्याचे सांगून आईने नकार दिला. बिग बी म्हणाले की मला आज त्या दोन रुपयांची किंमत आठवते. यानंतर, पुन्हा बच्चन अजून सांगितले की आपल्याला एक कॅमेरा हवा आहे, जो तो बर्‍याच वर्षांनंतर मिळाला, वडिलांनी तो रशियाहून आणला होता. या बीग बी यांच्या अनुभवामुळे सर्वच प्रेक्षक भावूक झाले होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like