तमन्ना भाटीया आणि विराट कोहलीला केरळ हायकोर्टाची नोटीस ! जाणून घ्या प्रकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि साऊथमधील फेमस ॲक्ट्रेस तमन्ना भाटीया (Tamannaah Bhatia) यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. ऑनलाईन रमी गेमनं या दोघांच्या अडचणी वाढवल्या आहेत. केरळ हायकोर्टानं विराट कोहली, तमन्ना भाटीया आणि अजु वर्गीज यांना ऑनलाईन सट्टेबाजीला प्रोत्साहन दिल्याबद्दल नोटीस पाठवली आहे. हे तिघेही रमी गेमचे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत. त्यामुळंच त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

याचिकाकर्त्यानुसार, या सगळ्यामुळं ऑनलाईन जुगारीचा धोका वाढत चालला आहे. याच्या विळख्यात आधी मध्यम व गरीब कुटुंबातील लोक येतात. त्यांच्यासाठी यामुळं आर्थिक जोखिमही निर्माण होत आहे. अनेकांचं यामुळं नुकसान झालं आहे. राज्यात अशी अनेक प्रकरणं समोर आली आहे ज्यात लोकांनी ऑनलाईन रमी गेममध्ये आपले पैसे गमावले आहेत.

याचिकाकर्त्यानुसार, अशा प्रकारच्या गेममध्ये जिंकण्याची शक्यताही नाहीच्या समान असते. प्रसिद्ध व्यक्तीला हाताल धरून हे प्लॅटफॉर्म्स लोकांना खोटी वचन देतात. त्यांना खोटा लोभ दाखवतात. हे सर्व लोकांना मुर्खात काढणं आहे.

असं सगळं असताना या याचिकेवर सुनावणी देताना केरळ हायकोर्टानं विराट, तमन्ना आणि अजु यांना नोटीस पाठवली आहे. याचिकाकर्त्यांनी ऑनलाईन रमी गेमवर कायदेशीर बंदी घालण्याची मागणी केली आहे. कोर्टानं यावर राज्य सरकारकडे उत्तरही मागितलं आहे.