Khuda Haafiz : नर्गिसला शोधण्यासाठी विद्युत जामवालनं मागितली ‘सिंघम’ला मदत, अजय देवगननं दिलं ‘हे’ उत्तर, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विद्युत जामवालचा खुदा हाफिज हा सिनेमा आज (14 ऑगस्ट) ला रात्री 7.30 वाजता डिजनी प्लस हॉटस्टार वर रिलीज होणार आहे. पण त्याआधी दिवसभर ट्विटरवर नर्गिसची शोधाशोध होत होती. आता नर्गिसचा शोध का चालू होता हे तर खुदा हाफिज सिनेमा पाहूनच लक्षात येईल. पण यामध्ये अजय देवगन आणि विद्युत जामवाल या दोघांमध्ये मजेदार संवाद आज ट्विटरवर दिसून आला.

विद्युतने अजय देवगनला टॅग करून लिहिलं कि, बाजीराव सिंगमने नेहमी सत्याचा साथ दिला आहे. नर्गिसला शोधण्यासाठी मला साथ देणार का? अजयने याचं उत्तर सिंघमच्या अंदाजात दिलं. अजयने लिहिलं- “जो कायदा मोडेल मी त्याची हाडं मोडेल, यावेळी हाडं मोडायची वेळ तुझी विद्युत, जा दाखव तुझी ताकत, खुदा हाफिज…”

खुदा हाफिज हा सिनेमा फारूक कबीरनी डायरेक्ट केला आहे. सिनेमात विद्युत सोबत शिवालीका ओबेरॉय मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शिव पंडित, अन्नू कपूर आणि आहना कुमरा देखील दिसणार आहेत. सिनेमाची कहाणी 2007-2008 च्या मंदीवर आधारित आहे. विद्युत समीर चौधरी नावाच्या युवकाची भूमिका साकारतोय. जो आपल्या पत्नीला ह्युमन ट्रॅफिकिंग करणाऱ्यांपासून वाचवण्यासाठी धडपड करत आहे. विद्युतने अजय देवगन सोबत बादशाहो मध्ये काम केलं होतं. यामध्ये विद्युतने निगेटिव्ह रोल केला होता.

29 जून ला एका पत्रकार परिषदेत एका वेळी अनेक सिनेमे प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले होते. यानुसार पहिला सिनेमा दिल बेचारा हा होता. कुणाल खेमुची लुटकेस प्रदर्शित झाला आहे. खुदा हाफिज तिसरा सिनेमा आहे. यानंतर 28 तारखेला सडक 2 प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारचा लक्ष्मी बम, अजय देवगनचा भुज द प्राईड ऑफ इंडिया आणि अभिषेक बच्चनचा बिग बुल ही येणार आहेत.