मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुड अभिनेत्री कियारा आडवाणी आपला आगामी चित्रपट ’इंदू की जवानी’ साठी खुप चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर अगोदरच रिलिज झाला आहे, ज्यास तिचे फॅन्स आणि चित्रपट समिक्षकांनी शानदार म्हटले आहे.
सध्या ती चित्रपटाशी संबंधित सर्व माहिती इंस्टाग्रामवर शेयर करत आहे. एका पोस्टमध्ये तिने सांगितले की, तिच्या या चित्रपटाचे नवीन गाणे रिलिज झाले आहे. शुक्रवारी या चित्रपटाचे गाणी जारी करण्यात आले. या गाण्याचे टायटल आहे ’हीलें टूट गई’. या गाण्याच्या व्हिडिओमध्ये कियारा अतिशय बोल्ड अंदाजात दिसत आहे.
कियाराने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून या गाण्याचा व्हिडिओ शेयर केला आहे. व्हिडिओमध्ये ती गोल्डन आउटफिटमध्ये दिसत आहे. ती एयर होस्टेसच्या गेटअपमध्ये लगेजसह डान्स करताना दिसत आहे. कियाराने गाण्याचा व्हिडिओ शेयर करून लिहिले आहे की – ड्रॉप द बीट अँड ब्रेक सम हील्स. माझा नवा चित्रपट इंदू की जवानीचे नवे गाणे जारी करणत आले आहे.
या चित्रपटात कियारा इंदिरा गुप्ता नावाच्या मुलीचे कॅरेक्टर प्ले करत आहे. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे की, चित्रपटात इंदिरा गुप्ताला प्रेमाने लोक इंदू म्हणतात. ती एका मुलाचा शोध घेत आहे, ज्याच्याशी तिला लग्न करायचे आहे, परंतु चित्रपटात तिला तसा मुलगा मिळत नाही, जसा तिला हवा आहे. चित्रपटा तिच्या आयुष्यात एका मुलाची एंट्री होते, मुलगा पाकिस्तानी आहे आणि नंतर इंदूला वाटते की, तो एक दशहतवादी असू शकतो. ट्रेलरवरून वाटू शकते की चित्रपटात भरपूर कॉमेडी आहे.
चित्रपट ’इंदू की जवानी’ पुढील महिन्यात 11 डिसेंबरला चित्रपटगृहात रिलिज होणार आहे. नुकतेच ओटीटीवर रिलिज झालेला चित्रपट ’लक्ष्मी’ मध्ये कियारा आडवाणी बॉलीवुडचा दिग्गज अभिनेता अक्षय कुमारसोबत दिसली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला, पण चित्रपट चालला नाही. चित्रपट प्रदशनापूर्वी खुपच वादात सापडला होता.