‘न्यूड’ फोटोमुळं कियारा आडवणी ‘ट्रोल’, नेटकरी म्हणाले- ‘भागो डब्बू कबीर सिंह आ रहा है’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमधील अनेक अ‍ॅक्ट्रेस प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानीच्या कॅलेंडरसाठी फोटोशुट करत असतात. त्याला सेलिब्रिटी फोटोग्राफर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. डब्बू प्रत्येक वर्षी आपल्या फोटोशुटमध्ये कोणत्या ना कोणत्या अ‍ॅक्ट्रेसला न्यूड किंवा टॉपलेस करतच असतो. आलिया भट पासून तर कॅटरीना कैफपर्यंत सर्वांनीच डब्बूसाठी हॉट फोटोशुट केलं आहे. नुकतेच त्यानं काही अभिनेत्रींचे न्यूड फोटो शेअर केले ज्यांची चर्चा होताना दिसत आहे. कियारा आडवाणी आपल्या फोटोमुळे ट्रोल होताना दिसत आहे.

अलीकडेच भूमी पेडणेकरचा बाथटबमधील फोटो समोर आला होता. या फोटोत ती न्यूड दिसत होती. डब्बू रतनानीच्या कॅलेंडर फोटोशुटसाठीच तिनं हा फोटो काढला होता. भूमीनंतर बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवणी, सनी लिओनी, अनन्या पांडे आणि कृती सेनन यांचे काही फोटो समोर आले ज्यात अभिनेत्री न्यूड दिसत होत्या. डब्बू रतनानीच्या 2020 च्या कॅलेंडरसाठी त्यांनी हे फोटोशुट केलं आहे. सध्या या फोटोंची सोशलवर जास्त चर्चा होताना दिसत आहे.

या सगळ्यात कियारा आडवाणीनं विशेष लक्ष वेधलं आहे. कारण कियारा पूर्णपणे न्यूड झाली आहे. कियारानं आपली अप्पर बॉडी एक झाडाच्या मोठ्या पानानं कवर केली आहे. कियारा कमालीची बोल्ड आणि हॉट दिसत आहे. सध्या कियाराचा हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. अनेकांनी कियाराच्या या लुकची खिल्ली उडवायाला सुरुवा केली आहे.

अनेकांनी कबीर सिंगचं नाव घेत तिच्यावर कमेंट केली आहे. अनेकांनी कियाराच्या बोल्ड फोटोंवर तऱ्हे तऱ्हेच्या कमेंट केल्या आहेत. अनेकांनी डब्बूलाही ट्रोल केलं आहे. काही नेटकऱ्यांनी कियारा आणि डब्बूचे अनेक मीम्स तयार केले आहेत जे सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत.

 

You might also like