कियारा आडवाणी ‘कॅलेंडर’साठी झाली ‘TOPLESS’, लोकांनी तिला घातले ‘तसले’ कपडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार कियारा आडवाणीनं नुकतंच डब्बू रतनानीच्या कॅलेंडरसाठी न्यूड फोटोशुट केलं होतं. कियारा पूर्णपणे न्यूड झाली होती. कियारानं आपली अप्पर बॉडी एक झाडाच्या मोठ्या पानानं कवर केल्याचं फोटोत दिसत होतं. या फोटोत कियारा कमालीची बोल्ड आणि हॉट दिसत होती. कियाराचं हे फोटोशुट प्रचंड व्हायरल झालं. अनेकांनी कियाराच्या या लुकची खिल्ली उडवायला सुरुवात केली आहे. कियारा आपल्या या फोटोसाठी प्रचंड ट्रोल झाली आहे.

कियाराचा हा टॉपलेस फोटो घेऊन अनेक नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स बनवले आहेत जे सध्या सोशलवर व्हायरल होत आहेत. कियारा पहिल्यांदाच न्यूड अवतारात दिसली आहे. पहिल्याच फोटोशुटसाठी ती ट्रोल होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B8vFGJbl4fz/?utm_source=ig_embed

काहींनी कियाराचा फोटो फोटोशॉप केला आहे आणि तिला कपडे घातले आहेत. कियारा अनेक फोटोत वेगळ्या कपड्यांमध्ये दिसत आहे. एका फोटोत ती साडीत दिसत आहे तर एका फोटोत ती टी शर्टमध्ये. एकानं तर तिला कॅप्टन अमेरिकाचा गेपअप दिला आहे.

अनेकांनी कियाराचा सिनेमा कबीर सिंग मधील डायलॉगचा वापर करत कियारावर मीम्स बनवले आहेत. सध्या कियाराचे हे मीम्स सोशलवर आगीसारखे व्हायरल होताना दिसत आहेत.

बॉलिवूडमधील अनेक अ‍ॅक्ट्रेस प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानीच्या कॅलेंडरसाठी फोटोशुट करत असतात. त्याला सेलिब्रिटी फोटोग्राफर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. डब्बू प्रत्येक वर्षी आपल्या फोटोशुटमध्ये कोणत्या ना कोणत्या अ‍ॅक्ट्रेसला न्यूड किंवा टॉपलेस करतच असतो. आलिया भट पासून तर कॅटरीना कैफपर्यंत सर्वांनीच डब्बूसाठी हॉट फोटोशुट केलं आहे.