‘सिक्सर किंग’ युवराजची Ex गर्लफ्रेंड किम शर्मा अमित सादला करतेय डेट ? खुद्द अभिनेत्रीनंच केला खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस किम शर्मा (Kim Sharma) गेल्या अनेक महिन्यांपासन सिल्व्हर स्क्रीनपासून दूर आहे. परंतु तिचे चाहते तिला सोशलवर फॉलो करतात. तीदेखील चाहत्यांसाठी आपले बोल्ड फोटो आणि व्हिडिओ सोशलवर शेअर करत असते. सोशलवर ती कायमच सक्रिय असते. आपल्या हॉटनेसमुळं कायम चर्चेत असणारी किम शर्मा आता डेटिंगच्या बातम्यांमुळं चर्चेत आली आहे.

अलीकडेच अशी बातमी समोर आली होती की, किम तिच्या आई वडिलांसह अभिनेता अमित साद (Amit Sadh) सोबत डिनर केलं आहे. यानंतर त्यांच्या डेटिंगच्या चर्चेच्या बातम्या समोर आल्या आहेत. यावर आता किमनं भाष्य केलं आहे.

अलीकडेच किम आणि अभिनेता हर्षवर्धन राणे (Harshvardhan Rane) यांचं ब्रेकअप झालं आहे. दोघांनी 1 वर्ष एकमेकांना डेट केलं आहे. 2018 मध्ये किम आणि हर्षवर्धन यांच्या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली होती.

https://www.instagram.com/tv/CHC8OutpCsZ/?utm_source=ig_embed

डिनरची बातमी समोर आल्यानंतर अनेकांनी दोघांच्या अफेअरबद्दलही बोललं आहे. यावर खुद्द किमनं भाष्य करत याबबात खुलासा केला आहे. ती अमितला डेट करत नसल्याचं तिनं सांगितलं आहे. किमनं हेही सांगितलं की, ही त्यांची पहिली भेट होती. अलीकडेच अमित सादनंही सांगितलं आहे की, तोदेखील सध्या सिंगल आहे.

किमच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, मोहब्बते या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. सध्या ती सिनेमांपासून दूर आहे. परंतु सोशल मीडियावरून ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते.