Birthday SPL : ‘या’ फेक फोटोमुळं वादात अडकली होती नेहा शर्मा, नंतर समोर येऊन दिलं स्पष्टीकरण

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा (Neha Sharma) त्या अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्या सोशल मीडियावर सुपर अ‍ॅक्टिव्ह असतात. खास बात अशी की, नेहा शर्मा तिच्या हॉट आणि बोल्डनेससाठी सोशल मीडियावर खूप फेमस आहे. नेहाची हॉट फिगर कायमच चाहत्यांना भुरळ घालत असते. नेहा आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. 2 वर्षांपूर्वी नेहा एका फेक फोटोमुळं चर्चेचा हिस्सा बनली होती. हे नेमंक काय प्रकरण होतं, याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत.

नेहाचा फेक फोटो झाला होता व्हायरल

नेहानं तिच्या इंस्टावरून मॉर्निंग पिक शेअर केला होता. यालाच सेक्स टॉय दाखवत एडिट करण्यात आलं होतं. या फोटोत बेडपाशी असलेल्या टेबलावर एक सेक्स टॉय दाखवण्यात आला होता. तिचा हा फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल झाला होता. तिचे असे फोटो पाहता अनेकांनी तिला बेशरम म्हटले होते.

नेहानं तिच्या ट्विटरवरून ओरिजनल पिक शेअर करत फोटो एडिट करणाऱ्यांवर निशाणा साधला होता. तिनं लिहिलं होतं की, हे खूप दु:खद आहे की, महिलांचा तिरस्कार करणारे लोक कोणत्या पातळीपर्यंत जाऊ शकतात. फोटो मॉर्फिंग बंद का. हा पाहा ओरिजनल फोटो.

नेहाची ही पोस्ट समोर आल्यानंतर तिच्या चाहत्यांनी तिला प्रोत्साहन देत तिचं समर्थन केलं होतं. अनेकांनी या पोस्टनंतर तिची बाजूही घेतली.

नेहाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर लवकरच ती सिद्धार्थ शुक्लासोबत एका म्युझिक व्हिडिओत दिसणार आहे. दिल को करार आया असं या व्हिडिओचं नाव आहे. अलीकडेच नेहा इल्लीगल (Illegal) या वेब सीरिजमध्ये काम करताना दिसली. नेहा पहिल्यांदा चिरुथा (Chirutha) या तेलगू सिनेमात काम करताना दिसली होती. परंतु हिंदी सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर मोहित सुरी डायरेक्टेड क्रूक हा तिचा पहिला हिंदी सिनेमा आहे. 2010 साली हा सिनेमा रिलीज झाला होता. यानंतर नेहानं अनेक सिनेमात काम केलं आहे. तेरी मेरी कहानी, क्या सुपर कूल है हम, यमला पगला दीवाना, हेरा फेरी 3 असे तिचे अनेक सिनेमे सांगता येतील. तुम बिन 2, मुबारकां, तान्हाजी या सिनेमातही तिनं भूमिका साकारली आहे.

 

You might also like