‘बिग बी’ अमिताभची नात नव्या नवेलीनं ‘रूमर्ड’ बॉयफ्रेंड मीजान जाफरीसाठी शेअर केली स्पेशल पोस्ट ! जाणून घ्याप्रकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) सोशल मीडियावर कायमच अॅक्टीव्ह असते. आपल्या फोटो आणि व्हिडीओंमुळं ती अनेकदा चर्चेतही आली आहे. अभिनेता जावेद जाफरी (Javed Jaffrey) चा मुलगा ॲक्टर मीजान जाफरी (Mizaan Jaffrey) सोबत ती अनेकदा स्पॉट झाली आहे. एकदा तर मीजान तिच्या सोबत असताना कॅमेऱ्यासमोर आल्यानंतर टीशर्टनं चेहरा लपवताना दिसला होता. पुन्हा एकदा आपल्या एका पोस्टमुळं आता हे कपल चर्चेत आलं आहे.

नव्यानं तिच्या इंस्टा स्टोरीला एक फोटो शेअर केला आहे. खास बात अशी की, हा फोटो मीजानचा आहे. फोटोत मीजान सर्टीफिकेट आणि ट्रॉफी हातात घेऊन दिसत आहे. नव्यानं त्याला फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

मीजान जाफरीला मंगेश हदावलेच्या मलाल या सिनेमासाठी बेस्ट डेब्यूचा अवॉर्ड मिळाला आहे. मीजानचा हा फोटो इंस्टाला शेअर करत नव्यानं लिहिलं की, अभिनंदन.

तसं पाहिलं तर हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाल करू शकला नव्हता. याच सिनेातून संजय लीला भन्साळी यांची पुतणी शरमिन सेगल हिनं डेब्यू केला होता.

मीजानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर संजय लीला भन्साळी यांच्या मलाल या सिनेमातून त्याने करिअरला सुरुवात केली. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चालला नाही. त्याला आवाजवरूनही लोकांनी ट्रोल केलं आहे. मीजानचा रोल पाहिल्यानंतर काहींनी असेही म्हटले की, तो संजय दत्तला कॉपी करत आहे. आता लवकरच मीजान हंगामा 2 सिनेमात काम करताना दिसणार आहे. या सिनेमात शिल्पा शेट्टी आणि परेश रावल प्रमुख भूमिकेत आहेत.