Birthday : अनेक चित्रपटांमध्ये काम करूनही फ्लॉप झाली ‘गँग्स ऑफ वासेपुर’ मधील ‘दुर्गा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   अभिनेत्री रीमा सेन आज आपला 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांचा जन्म 29 ऑक्टोबर 1981 रोजी कोलकाता येथे झाला होता. 1996 मध्ये पहिल्यांदा बंगाली थिएटरमधून त्यांनी अभिनयात पदार्पण केले आणि 1998 मध्ये भोजपुरी चित्रपटाद्वारे त्यांनी मोठ्या स्क्रीनवर पदार्पण केले. तर, आज त्यांच्या वाढदिवशी त्यांच्या चित्रपट प्रवासाविषयी जाणून घेऊया…

रीमा सेनने 1998 ते 2012 या काळात मराठी ते भोजपुरी, तामिळ, तेलगू आणि हिंदी या चित्रपटांत अनेक चित्रपटांत काम केले, परंतु तरीही त्या चित्रपट जगतात आपला ठसा उमटवू शकल्या नाही.

2011 मध्ये चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या गँग्स ऑफ वासेपुरमधून रीमाला लोक ओळखू लागले. या चित्रपटात त्यांच्या दुर्गाच्या व्यक्तिरेखेमुळे प्रेक्षकांमध्ये त्यांची ओळख निर्माण झाली.

गँग्स ऑफ वासेपुर नंतर लोकांनी त्यांना ओखळण्यास सुरुवात केली नाही की लगेच त्यांनी चित्रपट जगापासून स्वतःला दूर केले. 2012 मध्ये, रीमा अखेरच्या Sattam Oru Iruttarai या तमिळ चित्रपटात दिसल्या होत्या.

खरं तर, 2012 च्या शेवटी, त्यांचे लग्न दिल्लीतील प्रसिद्ध हॉटेलवाले शिवकरण सिंहशी झाले होते, त्यानंतर त्या एकाही चित्रपटात दिसल्या नाही. 2013 मध्ये रीमा सेनने एका मुलाला जन्म दिल्याची बातमी आली. सध्या त्या हाउस वाइफची भूमिका साकारत आहे.

You might also like