अखेर आईनं का केलं ‘दबंग 3’ ची हिरोईन सई मांजरेकरचं कौतुक ? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : दबंग 3 मध्ये सलमान खानसोबत काम करणारी आणि अभिनेते महेश मांजेरकर यांची लेक सई मांजरेकर सध्या चर्चेत आली आहे. अलीकडेच सईनं इंस्टावरून लाईव्ह चॅट केलं. यावेळी तिनं अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यावेळी आईबद्दलचा आणि अक्टींगचा खास किस्साही सईनं सांगितला आहे.

https://www.instagram.com/p/CAxuTh7Akmc/

इंस्टावरून केलेल्या लाईव्ह चॅटमध्ये सईनं सांगितलं की, तिच्या आईची तिच्या डोळ्यांबद्दल कायमच तक्रार असायची. तिचे डोळे खास नाहीत असं आईला वाटायचं. परंतु दबंग 3 सिनेमात तिची अ‍ॅक्टींग पाहिल्यानंतर तिच्या आईनं तिचे डोळे आणि अ‍ॅक्टींग असं दोन्हीचंही खूप कौतुक केलं. इतकंच नाही तर या सिनेमानंतर चाहत्यांनीही तिच्या डोळ्यांचं कौतुक केलं असं ती सांगते.

सईनं यावेळी बोलताना असंही सांगितलं की, तिला जर संध मिळाली तर दिल धडकने दो या सिनेमातील प्रियंका चोपडाचा रोल करायला तिला खूप आवडेल. ब्रॅड पिट आणि सलमान खानं तिचे आवडते हिरो आहेत असंही ती म्हणाली. शिरा ही तिचा आवडती डिश आहे असंही ती म्हणाली.

सईच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सलमान खानच्या दबंग 3 सिनेमात तिनं काम केंल आहे. हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला होता. हा सईचा डेब्यू सिनेमा होता.

https://www.instagram.com/p/B-mW3LkAtHr/

https://www.instagram.com/p/B8nmw4hgF2v/

https://www.instagram.com/p/B8ixTFYgERN/

https://www.instagram.com/p/B8dhe10AHnA/

https://www.instagram.com/p/B7xT-R7ACZ5/

https://www.instagram.com/p/B7dHxNfA1hy/