Adipurush : ‘प्रभास-सैफ’च्या ‘आदिपुरुष’ सिनेमात ‘ही’ अभिनेत्री साकारणार ‘सीते’ची भूमिका !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बाहुबली (Baahubali) फेम प्रभास (Prabhas) गेल्या अनेक दिवसांपासून आदिपुरुष (Adipurush) या आगामी सिनेमामुळं चर्चेत आहे. अलीकडेच सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे. तान्हाजी द अनसंग वॉरियरचे (Tanhaji: The Unsung Warrior) डायरेक्टर ओम राऊत (Om Raut) यांनी आगामी आदिपुरुष (Adipurush) सिनेमाची रिलीज डेट सांगितली आहे. तेच या सिनेमाच डायरेक्शन करत आहेत. आता यात काम करणाऱ्या कलाकारांची माहिती देखील समोर आली आहे.

ओम राऊत यांनी सोशल मीडियावर ट्विट करत सांगितलं होतं की, 11 ऑगस्ट 2022 रोजी आदिपुरुष हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

प्रभास या सिनेमात भगवान रामाची भूमिका साकारणार आहे. तर सैफ अली खान (Saif Ali Khan) सिनेमात रावणाचा रोल साकारणार आहे. प्रभास या सिनेमात आदिपुरुष हा लिड रोल साकारत आहे. हा एक बिग बजेट सिनेमा असणार आहे. एका इंग्रजी वृत्तानुसार या सिनेमाचं बजेट 350 ते 400 कोटी एवढं आहे. सिनेमासी संबंधित लोकांना असं वाटत आहे की, हा सिनेमाही बाहुबली सिनेमा प्रमाणे इतिहास रचेल. चाहतेही या सिनेमाला घेऊन खूप उत्सुक आहेत.

या सिनेमात सीतेचा रोल कोण साकारणार आहे यावरून अनेकजण उत्सुक आहेत. आतापर्यंत सीतेच्या रोलसाठी अनेक नावं समोर आली आहे. या यादीत कियारा आडवाणी (Kiara Advani), अनुष्का शर्मा (Anushka Sharma), कृती सेनन (Kriti Sanon), दीपिका पादुकोण (Deepika Padukone), कीर्ति सुरेश (Keerthy Suresh) आणि अनुष्का शेट्टी (Anushka Shetty) अशा अनेक नावांचा समावेश आहे. परंतु कोण ही भूमिका साकरणार आहे याचा खुलासा अद्याप झालेला नव्हता. आता सीतेच्या रोलसाठी कलाकाराचा शोध संपला आहे. एका इंग्रजी वृत्तानुसार, बॉलिवूड अॅक्ट्रेस कृती सेनन सिनेमात सीतेची भूमिका साकारणार आहे.

सूत्रांच्या हवाल्यानं या वृत्तात सांगण्यात आलं आहे की, सीतेच्या भूमिकेसाठी अनेक नावांवर चर्चा झाली. यानंतर मेकर्सनं कृतीचं नाव फायनल केल्याचं समजत आहे. कृतीला जेव्हा आदिपुरुष सिनेमात सीतेच्या रोलसाठी विचारलं गेलं तेव्हा तिनं लगेचच यासाठी होकार दिला.

आदिपुरुष या थ्रीडी अ‍ॅक्शन सिनेमाची शुटींग 2021 मध्ये सुरू होणार आहे. हा सिनेमा हिंदी आणि तेलगू भाषेत शुट केला जाणार आहे. तर तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत डब केला जाणार आहे. याला ऐतिहासिक सिनेमा बनवण्यासाठी प्रयत्न केले जाता आहे. याच्या VFX साठी अवतार आणि स्टार वॉर्स सारख्या हॉलिवूड सिनेमांच्या टीमची मदत घेण्याचाही प्रयत्न सुरू आहे.

You might also like