मास्क लावून फ्लाईटमध्ये एकटीच बसली कृती सेनन, म्हणाली – ‘श्वास घेता येत नाही’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसच्या भीतीमुळं अनेक कलाकारांनी आपलं शुटींग आणि काही दौरे रद्द केले आहेत. जे कलाकार बाहेर पडत आहेत तेही खबरदारी घेताना दिसत आहेत. मास्क लावत आहेत. अलीकडेच प्रभास तोंडाला मास्क लावून जाताना एअरपोर्टवर दिसला होता. यानंतर आता कृती सेननचा एक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओत दिसत आहे की, प्लाईटमध्ये कृती सेनन एकटीच मास्क लावून बसली आहे. कृतीचा हा व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होतान दिसत आहे. चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनीही कृतीच्या या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत दिसत आहे की, कृती फ्लाईटमध्ये विंडो सीटवर बसली आहे. फ्लाईटमध्यये पॅसेंजरही दिसत नाहीत. फक्त कृती एकटीच आहे तेही ती मास्क लावून बसली आहे. कॅमेरा तिच्या जवळ जाताच कृती म्हणते, वेलकम टू माय प्रायवेट जेट. जेव्हा तिला मास्कबद्दल विचारण्यात आलं तेव्हा ती म्हणाली, यात श्वास घेता येत नाही. कृतीचा हा व्हिडीओ सध्या वाऱ्यासारखा परसत आहे. अनेकांनी या व्हिडीओवर एकामागोमाग एक मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

एकानं म्हटलं की, आय होप की हिला कोरोना व्हायरस व्हावा. तिची ओव्हरअ‍ॅक्टींग एकदाच बाहेर निघावी. एकानं कमेंट केली की, सगळं प्लेन रिकामं आहे. तरीही मास्क लावलं आहे. आणखी एकजण म्हणतो, याला धाडस नाही छिछोरापन म्हणतात.”

कृतीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती मिमी या सिनेमात काम करताना दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत पंकज त्रिपाठी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. लक्ष्मण उटेकर यानं हा सिनेमा डायरेक्ट केला आहे. 20 डिसेंबर 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.