कंगना रणौतच्या ‘या’ ट्विटवर कुणाल कामराचं उत्तर, म्हणाला – ‘लाईट इथं गेली आणि फ्यूज तुमचा का उडाला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत काही दिवसांपासून खूप ॲक्टिव्ह आहे. आपल्या विधानावरुन ती नेहमी चर्चेमध्ये असते. नुकतेच या अभिनेत्रीने चित्रपट दुनियेपासून ते राजकीय जगाशी संबंधित लोकांवर थेट नाव घेऊन शब्दांचा हल्ला केला आहे आणि अनेक आरोपही केले आहे. यामध्ये कॉमेडियन कुणाल कामराचे नाव देखील सामिल आहे. ज्याबद्दल कंगनाने अनेकदा ट्विट केले आहे. त्याचबरोबर खास गोष्ट अशी आहे की, कुणाल कामरा देखील कंगनाच्या ट्विटला शानदारपणे उत्तर देत आहे.

पुन्हा एकदा असेच घडले आहे. वास्तविक, कंगना रणौतने मुंबईतील पॉवरकटवर आपली प्रतिक्रिया दिली होती आणि तिने कुणाल कामराचा एक फोटो तिच्या ट्विटमध्ये पॉवरकटबाबत शेअर केला होता. या फोटोत कुणाल कामरा हे शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासमवेत आहेत. या दोघांचे फोटो शेअर करुन कंगनाने महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका केली होती.

अभिनेत्रीने फोटोसह लिहिले की, ‘मुंबईमध्ये पॉवरकट, दरम्यान महाराष्ट्र सरकार क-क-क ……. कंगना.’ आता कंगनाच्या या ट्विटवर कुणाल कामरा यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून कंगनाचे पोस्ट रिट्वीट करून लिहिले आहे की, ‘मॅम, लाईट येथे गेली आहे आणि तुमचा फ्यूज का उडाला आहे.’ आता कंगनाच्या विरोधात बोलणाऱ्या कुणाल कामराच्या ट्विटमध्ये तो कंगनाची थट्टा करत आहे, तर कंगनाचे समर्थक त्याच्याविरोधात ट्विट करत आहेत.

कुणाल कामरा आणि कंगन रणौत ट्विटरवरुन समोरासमोर येण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही दोघेही ट्विटच्या माध्यमातून एकमेकांना भिडले आहेत. त्यावेळी कुणाल कामरानेही कंगनाच्या सुरक्षा संदर्भात आवाज उठविला होता आणि त्यानंतरही कंगनाने कुणाल कामराला प्रत्युत्तर दिले होते. कुणाल कामराने कंगनाची तुलना सद्गुरुशी केली होती, त्यानंतर अभिनेत्री भडकली. वास्तविक, कंगनाने यापूर्वी शो बिझनेसला विषारी म्हणून वर्णन केले होते. या ट्विटला उत्तर देताना कुणाल कामराने कंगनाची आध्यात्मिक गुरु सद्गुरुशी तुलना केली होती.