विद्युत जामवालनंतर आता डिज्नी प्लस हॉटस्टारवर ‘भडकला’ अभिनेता कुणाल खेमू !

कोरोनाची स्थिती पाहता देशात 1 जुलैपासून अनलॉक 2.0 ची सुरुवात होत आहे. परंतु या काळातही थिएटर आणि मल्टीप्लेक्स बंदच राहणार आहेत. अशात ज्या सिनेमांची रिलीज अडकली आहे असे सिनेमे आता ओटीटीवर रिलीज होणार आहेत. अभिनेता कुणाल खेमू याचा लूटकेस हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. सिनेमाच्या रिलीजमुळं तर कुणाल खुश आहे. परंतु असं काहीतरी झालं आहे ज्यामुळं तो नाराज झाला आहे.

डिज्नी प्लस हॉटस्टारनं काही बडे सिनेम रिलीज करण्याची घोषणा केली आहे. यासाठी काही बडे कलाकार लाईव्ह आले आणि त्यांनी सिनेमाबद्दल सांगितलं. परंतु या लाईव्ह सेशनसाठी बोलावलं नाही म्हणून कुणाल खेमू भडकला आहे. कुणाल एवढा नाराज झाला की, सोशल मीडियावर ट्विट करत त्यानं आपला राग व्यक्त केला आहे.

कुणालनं ट्विट केलं की, “आदर आणि प्रेम मागितलं जात नाही तर ते कमावलं जातं. कोणी दिलं नाही तर आपण लगेच लहान होत नाही. खेळण्यासाठी फक्त एक सारखंच मैदान द्या. आम्हीही उंच उडी मारू शकतो.”

कुणालच्या ट्विटवरून त्याची नाराजी आणि नाखुशी स्पष्ट दिसत आहे. याआधी विद्युत जामवाल यानंही राग व्यक्त केला होता. कारण त्यालाही आमंत्रित केलं गेलं नव्हतं.

ज्या पाच सिनेमांच्या 5 कलाकारांना लाईव्हसाठी संधी मिळाली त्यात अक्षय कुमार, अजय देवगण, आलिया भट, अभिषेक बच्चन, वरुण धवन यांचा समावेश आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like