आत्महत्या करण्यापुर्वीच्या रात्री ‘असं’ काही घडलं होतं, कुशल पंजाबीच्या वडिलांनी केला ‘खुलासा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – अभिनेते कुशल पंजाबी यांनी 27 डिसेंबर रोजी आत्महत्या केली होती. यामुळे संपूर्ण चित्रपट क्षेत्राला धक्का बसला होता. कुशल यांच्या मृत्यूनंतर अनेक महत्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. वैवाहिक जीवनामुळे ते खूप अडचणीत होते. नुकतेच त्यांच्या वडिलांनी आत्महत्येच्या एक रात्र आधी नेमके काय झाले होते याचा खुलासा केला आहे.

कुशल आत्महत्येपूर्वी एका पार्टीमध्ये सामील झाला होता. एका मॅगझिनने दिलेल्या वृत्तानुसार कुशलच्या वडिलांनी सांगितले की, आत्महत्येच्या एक दिवस रात्री तो एकदम व्यवस्थित होता. तसेच आम्ही सोबत मद्यपान आणि जेवण देखील केले असल्याचे कुशलच्या वडिलांनी सांगितले. आमच्यात त्यावेळी काही विशेष चर्चा झाली नाही तसेच त्यांनी कुशलला त्यांना झालेल्या दुखापतीबाबत देखील सांगितले.

त्यांनी सांगितले की, कुशल सर्किट रेस दरम्यान दुखापतग्रस्त देखील झाला होता. त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया केली जाणार होती अशी माहिती कुशलच्या वडिलांनी दिली. कुशलच्या एका मित्राने देखील त्याच्या आईने आपल्याकडे चौकशी केल्याचे सांगितले होते.

कुशलचा जवळचा मित्र असलेल्या हंसराजला त्याच्या आई वडिलांनी फोन करून सांगितले होते की, त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा उघडत नाहीय. त्यानंतर चावीवाल्याला बोलावून दरवाजा उघडण्यात आला तेव्हा समजले की, कुशलने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. चेतन हंसराज यांनीच खुलासा केला होता की, कुशलच्या वैवाहिक जीवनात काही समस्या सुरु होत्या. कुशलची पत्नी त्याच्या मुलाला घेऊन फ्रान्समध्ये राहत होती. त्याने आपल्या संपत्तीचे देखील दोन हिस्से केले होते अर्थी संपत्ती मुलाच्या नावे तर अर्धी संपत्ती आई वडिलांच्या नावे केली होती.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/