आयुष्मान खुरानाचा ‘हा’ सिनेमा पाहून लता मंगेशकर झाल्या त्याच्या ‘फॅन’, ‘ट्विट’ करत म्हणाल्या…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार आयुष्मान खुरानाचा शुभ मंगल ज्यादा सावधान हा सिनेमा अलीकडे रिलीज झाला आहे. क्रिटीक्ससोबतच चाहत्यांनीही सिनेमाला चांगले रिव्ह्यु दिले आहेत. सुरांची कोकिळा लता मंगेशकर यांनीही आयुष्मानच्या अ‍ॅक्टींगचं कौतुक केलं आहे. त्यांनी अलीकडेच त्याचा अंधाधुन सिनेमा पाहिला आहे. यानंतर लता मंगेशकर यांनी आयुष्मानची स्तुती केली आहे.

लता मंगेशकर यांनी आयुष्मानचं कौतुक करत ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये त्या म्हणतात, “आयुष्मान जी नमस्ते. मी आज तुमचा अंधाधुन सिनेमा पाहिला. तुम्ही खूप चांगलं काम केलं आहे. तुम्ही जी गाणी गायली आहेत तीही खूप चांगली आहेत. माझ्याकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला भविष्यात आणखी यश मिळो अशी मी आशा करते.”

आयुष्मान खुरानानंही लता मंगेशकरांच्या ट्विटला उत्तर दिलं आहे. आयुष्मान म्हणतो, “लता दी तुमचे हे शब्द माझ्यासाठी खूप काही आहे. तुमच्या या प्रोत्साहनासाठीच कदाचित मी एवढी मेहनत केली होती. आशीर्वादासाठी धन्यावाद.”

आयुष्मानचा अंधाधुन हा सिनेमा 5 ऑक्टोबर 2018 रोजी रिलीज झाला होता. या सिनेमासाठी आयुष्मानला नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. हा एख थ्रिलर सिनेमा आहे ज्यात आयुष्माननं एका अंध व्यक्तीची भूमिका साकारली होती.