‘कार्तिक-सारा’चा रोमँस, ‘बोल्ड’ सीन्स आणि प्रेमाचं त्रिकुट… ‘लव आज कल 2’ चा ट्रेलर रिलीज (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – 2020 च्या सुरुवातीलाच अनेक मोठे सिनेमे रिलीज होताना दिसत आहेत. अशात सारा अली खान आणि कार्तिक आर्यनच्या लव आज कल 2 सिनेमाची चर्चा होताना दिसत आहे. हा सिनेमा मॅजिकल असल्याचं बोललं जात आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर समोर आला आहे. काही दिवसांपूर्वीच सिनेमाचं पोस्टर समोर आलं होतं जे प्रचंड व्हायरल झालं होतं. यानंतर आता सिनेमाचा ट्रेलर समोर आला आहे जो चर्चेत आहे. चाहत्यांना ट्रेलर आवडताना दिसत आहे.

सिनेमात कार्तिक आणि साराचा इंटेस रोमँस आणि मनाला स्पर्श करणारी केमिस्ट्री दिसत आहे. सिनेमात दोघांचे किसिंग सीन्स आणि इंटिमेट सीन्सही पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच हे किसिंग सीन लीक झाल्यानं चर्चेत आले होते.

लव आज कालच्या पहिल्या पार्टप्रमाणे याच्या सिक्वलमध्येही दोन प्रेमकहाण्या पॅरलल चालताना दिसत आहेत. आधीप्रमाणेच या भागातही इंटेस आणि कॉम्प्लिकेशन्स आहेत. सारा अली खान जो ची भूमिका साकारत आहे तर वीर म्हणून कार्तिक आर्यन दिसत आहे. दोघांनीही प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. सिनेमात 1990 ची स्टोरी आणि दुसरी 2020 ची आहे.

इम्तियाज अलीनं दिग्दर्शित केलेला हा सिनेमा व्हॅलेंटईन्स डेच्या दिवशी म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. 31 जुलै 2009 रोजी लव आज कलचा पहिला पार्ट रिलीज झाला होता. आता 11 वर्षांनंतर सिनेमाचा दुसरा पार्ट रिलीज होत आहे. या सिनेमात दीपिका आणि सैफ अली खान सोबत दिसले होते. आता सिक्वलमध्ये सैफची मुलगी सारा दिसणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like