नीना गुप्ता आणि ‘क्रिकेटर’ विवियन रिचर्ड्सची अनोखी Love Story ! मुलीला जन्म दिल्यानंतर झाला होता अफेअरचा खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार नीना गुप्ता आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. जवळपास 30 वर्षांपूर्वी नीना गुप्ता वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटर विवियन रिचर्ड्स सोबत रिलेशनमध्ये राहणं आणि अविवाहित असून आई बनण्यामुळं चर्चेत आली होती. नीनाची ही लव्ह स्टोरी त्या काळात खूपच बोल्ड आणि धुमाकूळ घालणारी होती. अविवाहित असूनही तिनं जेव्हा मुलीला जन्म दिला तेव्हा तू खूपचत चर्चेत आली होती. नीनानं त्यावेळी, समाज आणि पालकांविरोधात जाऊन आई बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला होता.

View this post on Instagram

Jab hum beach pe chalte thay koee nahin phir chalenge

A post shared by Neena Gupta (@neena_gupta) on

नीनानं जेव्हा मुलीला जन्म दिला तेव्हा रेकॉर्डवर वडिलांचं नाव नव्हतं. जेव्हा मीडियानं नीनाला बाळाच्या वडिलांचं नाव विचारलं तेव्हा तिनं सांगायला नकार दिला. यावर खूप काळ चर्चा होताना दिसली. हे कोड उलगडलं परंतु वेळ लागंलं. एके दिवशी एका पत्रकाराच्या प्रयत्नानंतर असं समोर आलं की, नीनाची लेक मसाबाचे वडिल दुसरा तिसरा कोणी नसून दिग्ग्ज क्रिकेटर विवियन रिचर्ड्स आहे.

विवाहित होता विवयन रिचर्ड्स

विवियननं एंटीगुआच्या मरियमसोबत लव्ह मॅरेज केलं होतं. त्याचं वैवाहिक जीवन सुखानं सुरू होतं. परंतु जेव्हा नीना विवच्या आयुष्यात आली तेव्हा तो स्वत:ला आवरू शकला नाही. नीना त्याला भेटायला त्याच्या दुसऱ्या घरी इंग्लंडला जात असे. कधी विव सुद्धा नीनाला भेटायला मुंबईला येत असे. सर्व काही गुपचूप सुरू होतं कोणाला काहीच माहित नव्हतं. जेव्हा नीना आई झाली तेव्हा याचा खुलासा झाला.

View this post on Instagram

Kahun ki munh band rakhun

A post shared by Neena Gupta (@neena_gupta) on

नीनानं केलं विवाहित व्यक्तीसोबत लग्न

नीना गुप्तानं चार्डर्ड अकाऊंटंट विवेक मेहरा याच्यासोबत 2008 साली लग्न केलं आहे. सध्या नीना आपल्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचं दिसत आहे. विवेक फेमस कंपनी प्राईस वाटरहाऊस कूपर्सचे पार्टनरही आहेत. विवेक आणि नीना यांनी जवळपास 6 वर्षे रोमँस केला आणि नंतर लग्न केलं. विवेक आधी विवाहित होता. परंतु पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर त्यानं नीनासोबत लग्न केलं.

View this post on Instagram

Return favour 😛😛free mein kuch nahin milta

A post shared by Neena Gupta (@neena_gupta) on

काही दिवसांपूर्वीच अशी माहिती आली होती की, नीना गुप्ता सध्या उत्तराखंडमधील मुक्तेश्वर हिल स्टेशनमधील आपल्या घरी पती विवेक मेहरा सोबत टाईम स्पेंड करत आहे. नीनाचा एक व्हिडीओ समोर आला होता ज्यात ती आनंदानं नाचताना दिसत होती. हा व्हिडीओ सोशलवर खूप व्हायरल होताना दिसला होता. नीना सोशलवर कायमच सक्रिय असते.

View this post on Instagram

Ab kahan jaogi fashion ker ke madam

A post shared by Neena Gupta (@neena_gupta) on

नीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अॅमेझॉन प्राईमची सीरिज पंचायतमध्ये दिसली होती. याशिवाय काही दिवसांपर्वीच तिनं शुभमंगल ज्यादा सावधान आणि पंगा या सिनेमात काम केलं आहे.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like