प्रियंका चोप्राच्या ‘या’ सीनचा फायदा घेत आहेत महाराष्ट्र पोलिस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘द स्काई इज पिंक’ चा ट्रेलर रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. ट्रेलरमध्ये एक सीन आहे जिथे प्रियंका म्हणते की ‘एक बार आयशा ठीक हो जाए ना, फिर साथ में बैंक लूटेंगे.’ आता महाराष्ट्र पोलिसांनी या सीनचा एका मीमसारखा उपयोग केला आहे आणि अशा गुन्ह्यांचा विचार करणाऱ्यांना इशारा दिला आहे. महाराष्ट्र पोलिसांनी ट्वीट करून लिहले की, आयपीसी कलम ३९३ अन्वये सात वर्षाचा कारावास व दंड. याचा अर्थ असा की जर आपण असा गुन्हा करण्याचा विचार करीत असाल तर शिक्षेसाठी आपल्याला सात वर्षे तुरुंगवासाची शिक्षा आणि कठोर दंड भरावा लागू शकतो.

या ट्विटमध्ये महाराष्ट्र पोलिसांनी प्रियंका चोप्रा आणि फरहान अख्तर यांनाही टॅग केले आहे. शोनाली बोस यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘द स्काई इज पिंक’ या चित्रपटाची मुख्य कलाकार जायरा वसीमच्या अफेअरच्या देखील चर्चा सुरु आहे. या चित्रपटाच्या शूटिंगनंतर जायराने बॉलिवूड सोडले. आता तिला ट्रेलरमध्ये पाहून लोक ट्रोल करुन म्हणत आहे की, झायराने चित्रपटात कसे काय पुनरागमन केले? ती आधी नाटक करत होती का?

जेव्हा जायराने बॉलिवूड सोडण्याची घोषणा केली तेव्हा तिच्यावर बरीच टीका झाली. पण जायराने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतलाच, मग प्रत्येकाने तिचा आदर केला पाहिजे. आता जर तिने यापुढे कधीही चित्रपटांमध्ये काम केले नाही तर ‘द स्काई इज पिंक’ हा तिचा शेवटचा चित्रपट असेल. हा चित्रपट 11 ऑक्टोबर 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे.

You might also like