‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीचा पती आहे महेश बाबू, कोटयावधींच्या प्रॉपर्टीचा ‘मालक’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – साऊथ सुपरस्टार महेश बाबू आज दि 9 ऑगस्ट रोजी आपला 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. साऊथ पासून पूर्ण भारतात त्याची फॅन फॉलोविंग आहे. त्याच्या प्रोफेशनल लाईफपासून तर त्याच्या पर्सनल लाईफ पर्यंत प्रत्येक गोष्ट त्याच्या स्टारडमविषयी तगडा पुरावा देत आहे. महेश बाबू कोटींच्या प्रॉपर्टीचा मालक आहे.

महेश बाबूने हिंदी सिनेमातील अ‍ॅक्ट्रेस नम्रता शिरोडकर सोबत लग्न केलं. 2005 साली तो विवाहबंधनात अडकला. दोघांना आज दोन मुलंही आहेत. तो नेहमीच फॅमिलीसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करत असतो. नुकताच त्याचा एक फोटो समोर आला होता ज्यात तो नम्रताला किस करताना दिसत होता. महेशने हा फोटो भारत अने नेनु या सिनेमाच्या यशाबद्दल शेअर केला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तो म्हटला होता की, “थँक्स माय लव्ह”

महेश बाबूकडे 6.02 कोटींची आलिशान व्हॅनिटी व्हॅन आहे. बॉलिवूडच्या किंग खानच्या व्हॅनिटी व्हॅनपेक्षा ही व्हॅन महाग आहे. त्याचा आणि नम्रताचा हैद्राबादच्या जुबली हिल्स भागात शानदार बंगला आहे. या बंगल्याची किंमत तब्बल 14 कोटी आहे.

महेश बाबूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, या तेलगू सुपरस्टारने 1999 साली आलेल्या राजकुमारूदु या सिनेमात मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारत करिअरला सुरुवात केली होती. या सिनेमासाठी त्याला सर्वश्रेष्ठ पुरुष कलाकाराचा पुरस्कार मिळाला होता. अद्याप त्याने 7 नंदी पुरस्कार, 5 फिल्मफेअर पुरस्कार, 3 सिनेमा पुरस्कार, 3 दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म पुरस्कार आणि एक आंतरराष्ट्रीय भारतीय फिल्म अकादमी पुरस्कार जिंकला होता.

आरोग्यविषयक वृत्त

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like