सुशांतच्या निधनानंतर ‘गर्लफ्रेंड’ रिया चक्रवर्ती आणि महेश भट यांचे ‘ते’ फोटो सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल ! भडकले लोक

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर प्रतिक्रिया देताना मुकेश भट यांनी सांगितलं होतं की, त्यांना आधीच याची चाहूल होती की, सुशांत असं काही करेल. या गोष्टीनंतर आता सुशांतचे चाहते भडकले आहेत. इतकंच नाही तर त्यांचे भाऊ महेश भट यांचेही काही वाद आता नव्यानं समोर येताना दिसत आहेत. अलीकडेच त्यांचा स्वत:चीच मुलगी पूजा भटसोबत लिपलॉक किसिंग सीनचा फोटो समोर आला होता. यानंतर आता सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि महेश भट यांचे काही न पाहिलेले फोटो सोशलवर व्हायरल होत आहेत.

सध्या समोर आलेले महेश भट आणि रिया यांचे हे फोटो आजचे नसून दोन वर्षांपूर्वीचे आहेत. पंरतु या फोटोंवरून आता लोक सोशल मीडियावर महेश भटला प्रचंड ट्रोल करत आहेत. सध्या महेश भट ट्विटरवर ट्रेंड करताना दिसत आहेत.

फोटोत दिसतंय की, महेश भट रियाला चिटकून खूप जवळ आल्यासारखे बसेल आहेत. काही फोटोत तर त्यांनी रियाच्या खांद्यावर डोकं ठेवलं आहे. असं वाटत आहे की, रियाही त्यांना जवळ घेत आहे. इतरही अनेक फोटो आहेत.

फोटोंबद्दल बोलायचं झालं तर हे फोटो रियानं 2018 साली तिच्या इंस्टावरून शेअर केले होते आणि महेश भटला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तिनं लिहिलं होतं की, हॅप्पी बर्थडे मेरे बुद्धा. सर तुम्ही मला सांभाळलंत, प्रेम दिलंत, उडायला शिकवलं. तुम्ही अशी व्यक्ती आहात जी दुसऱ्याला प्रकाशमान करते.”

सध्या तरी हे फोटो लोकांना खटकताना दिसत आहेत. काहींनी तर रिया आणि महेश भट यांनाच सुशांतच्या आत्महत्येसाठी कारणीभूत ठरवलं आहे.