‘मलायका-अर्जुन’ पुन्हा एकदा ‘स्पॉट’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा खूप दिवसांपासून आपल्या रिलशनशिपमुळे चर्चेत आहेत. अनेक ठिकाणी त्या दोघांना सोबत बघितले जाते आणि या कारणामुळेच त्यांच्या अफेयरबद्दलच्या बातम्या येत असता. मात्र त्या दोघांनी या गोष्टीवर कधीच चर्चा केली नाही. आता पुन्हा एकदा अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा सोबत दिसून आले. अर्जुन आणि मलायका मुंबई एअरपोर्टवर पुन्हा एकदा स्पॉट झाले. एकत्र जातांना दोघेसोबत कॅमेरामध्ये कैद झाले. फोटोमध्ये अर्जुनने डिझायनर टी-शर्ट आणि ब्लू जीन्स घातली आहे आणि मलायका रेड कलरच्या ड्रेसअपमध्ये दिसते आहे.

अर्जुन कपूरचा लुक खूप वेगळा दिसत होता. कदाचित तो पुढच्या चित्रपटाच्या तयारीला लागला असावा. काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूरने मलायका सोबत असलेल्या रिलेशनशिप बद्दलची गोष्ट समोर आणली होती. अर्जुनने सांगितले होते की, मला तिच्यासोबत खूप कम्फर्टेबल वाटते आणि ही गोष्ट मीडियाला देखील माहिती आहे. मीडियाचा हेतू कधीच माझ्या आणि मलायकासाठी चुकीचा नव्हता. कधीच त्यांनी चुकीची गोष्ट देखील लिहिली नाही. याच कारणामुळे इंडियाज मोस्ट वॉन्टेडच्या स्क्रीनिंग वेळी आम्ही दोघे समोर आलो. कारण मीडियाने आम्हाला इज्जत दिली. अर्जुनाचा चित्रपट इंडियाज मोस्ट वॉन्टेड स्क्रीनिंगवर सुद्धा मलायका- अर्जुन सोबत दिसून आले होते. दोघे एकमेकांसोबत खूप कम्फर्टेबल आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

सतत तणावग्रस्त राहिल्यास चेहऱ्याची चमक फिकी पडते

धक्कादायक ! मनुष्यांच्या कवटीतून बाहेर येत आहेत शींग

झोपेत आलेल्या हार्ट अ‍ॅटकची माहिती देणार ‘हे’ नवे तंत्रज्ञान

गवारीचे ‘हे’ फायदे तुम्ही वाचले तर होईल ‘आवडती भाजी’