home page top 1

बर्थडे पार्टीत मलायका,अर्जून कपूरसह इतर बॉलिवूड स्टारचा ‘खुल्लमखुल्ला’ डान्स (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आपला 45 वा वाढदिवस साजरा करीत आहे. वाढदिवसानिमित्त मलायकाने मुंबईच्या फाइव्ह स्टार हॉटेल जेडब्ल्यू मॅरियट मुंबई जुहू येथे पार्टी आयोजित केली होती. जिथे बॉयफ्रेंड अर्जुन कूपर, बेस्ट फ्रेड करिना कपूर, बहीण अमृता अरोरा यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक स्टार्स सहभागी झाले होते. मलायकाच्या वाढदिवसाच्या पार्टीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही फोटोंमध्ये ती करीना आणि अमृतासोबत पोज देत आहे, तर काही फोटोंमध्ये ती अर्जुन कपूरसोबत उभी आहे.

View this post on Instagram

And the birthday girl ❤🔥 #MallaikaArora

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

पार्टीमध्ये मलायकाने गोल्डन कलरचा स्पार्कल शॉर्ट ड्रेस परिधान केला होता ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. मलायकाच्या पार्टीचा एक व्हिडिओही सध्या व्हायरल होतोय. या व्हिडीओत मलायका आणि अर्जुन डान्स करताना दिसत आहेत.

अर्जुन कपूर आणि करिना कपूर, करिश्मा कपूर, अनन्या पांडे, तारा सुतारिया, करण जोहर, अर्जुन रामपाल आदींसोबत मलायकाने आपला वाढदिवस सेलिब्रेट केला. या बर्थ पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.ज्यात सर्व कलाकार अगदी वेगळ्या आणि जबरदस्त स्टाईलमध्ये दिसत आहेत.

 

Visit : Policenama.com

 

Loading...
You might also like