Malaika Arora Dance Performance : ‘इंडियाज बेस्ट डान्सर’मध्ये ‘या’ गाण्यांवर थिरकणार मलायका अरोरा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – डान्स रिअ‍ॅलिटी शो इंडियाज बेस्ट डान्सर (India’s Best Dancer) च्या टॉप 5 फायनलिस्टची निवड गेल्या आठवड्यातच झाली आहे. या आठवड्यात ग्रँड फिनाले होणार आहे. यात कंटेस्टेंटसोबतच गेस्टही धमाकेदार परफॉर्मन्स देणार आहेत. मलायका अरोरा (Malaika Arora) हिचा डान्सही पाहण्यासारखा असणार आहे. मुन्नी बदनाम हुई, अनारकली, छैया छैया अशा गाण्यांवर मलायका थिरकताना दिसणार आहे.

याचा एक प्रोमो व्हिडिओदेखील समोर आला जो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. यात मुन्नी गाण्यावर मलायका काही स्टेप्स करताना दिसत आहे. यात मलायकाचा लुकही कमाल दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत सांगितलं आहे ग्रँड फिनालेसाठी ते खूप उत्सुक आहेत.

याबाबत बोलताना मलायकानं सांगितलं की, डान्स परफॉर्मन्ससाठी मी खूप उत्साहित आहे. आणि काहीशी नर्वससुद्धा. कारण मी माझ्याच गाण्यांवर डान्स करत आहे. परंतु उत्साह आणि जोश अजिबात कमी नाही हेही नक्की आहे. फायनलिस्टदेखील त्यांच्या डान्स स्टाईलबद्दल खूप उत्साहित आहेत. मी पाचही फायनलिस्टना शुभेच्छा देते, असंही ती म्हणाली आहे.

46 वर्षांची मलायका आजही खूपच यंग दिसते. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ती खूप मेहनत घेत असते. या वयातही मलायका कमालीची हॉट आणि सेक्सी दिसते. भल्या भल्या अभिनेत्री तिच्या हॉटनेसपुढे फिक्या दिसतात. मलायका आपला बॉयफ्रेंड अर्जुन कपूरमुळेही चर्चेत असते. आता त्या दोघांनीही आपलं नातं ऑफिशियल केलं आहे.

मलायकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या ती सिनेमांपासून दूर आहे. आजवर मलायकानं अनेक सिनेमात आयटम नंबर केले आहेत, जे खूप गाजले आहेत.

You might also like