मुलगा अरहान आणि पहिला पती अरबाज खानबाबत मलायकाचं ‘मोठं’ वक्तव्य !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचं नातं गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अर्जुन कपूर आपल्या ३४ व्या वाढदिवसानिमित्त मलायकासोबत न्यूयॉर्कमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी गेला होता. यादरम्यान दोघांच्या अनेक प्रेमाच्या पोस्टही समोर आल्या होत्या. नुकतीच मलायका अरोरा एका मुलखातीत अर्जुनबाबत खुलून बोलली होती. यावेळी तिने सांगितले होते की, तिने आपला मुलगा अरहानला या नात्याबद्दल सांगितले आहे. इतकेच नाही तर, तो या नात्यामुळे खुश आहे. पुन्हा एकदा आता मलायकाने मुलगा अरहान आणि अरबाज खानबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

‘दोन लोकांमध्ये असणारी वर्तणूक व्यक्तिगत आणि पवित्र ; जज करणं चुकीचं’ : मलायका

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत मलायका म्हणाली की, “एका नात्यात असले तरी आई म्हणून माझ्याकडून काहीही बदललेलं नाही. दोन लोकांमध्ये ज्या प्रकारे वर्तणूक किंवा व्यवहार होतो तो खूप व्यक्तिगत आणि पवित्र असतो. दोन लोक ज्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे तेच यामागील वास्तविक कारणांबद्दल जाणतात. कोणालाही जज करणं हे चुकीचं आहे.”

‘वेगळं झाल्यावर मला असुरक्षित वाटायचं’ : मलायका

पुढे बोलताना मलायका म्हणाली की, “अरबाज आणि मी मुव्ह ऑन झालो आहोत. आम्हाला आमचा मुलगा अरहानच्या गरजांना घेऊन संवेदनशील व्हायला हवं. जेव्हा आम्ही वेगळं झालो तेव्हा मला असुरक्षित वाटत होतं. तसं तर मी कमोजर नाहीये. मला नव्हतं माहीत की, मला कोणत्या दिशेला जायचं होतं.”

‘माझ्या जीवनाला आकार देण्यात अरहानचा मोठा रोल’ : मलायका

मलायका म्हणाली की, “माझा मुलगा माझी प्राथमिकता आहे. तो मला खूप समजून घेतो आणि सपोर्टही करतो. माझ्यासाठी हे खूप गरजेचं होतं. त्याच्यासाठी माझी खुशी आणि माझ्यासाठी त्याची खुशी सर्वाधिक महत्त्वाची आहे. अरहानने माझ्या जीवनाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका साकारली आहे.”

मलायकाने ट्रोलर्सना दिले जोरदार ‘प्रत्युत्तर’

यावेळी बोलताना मलायकाने ट्रोलर्सनाही जोरदार प्रत्युत्तर दिले. मलायका म्हणाली की, “लोकं माझ्याबद्दल काय विचार करतात, काय म्हणतात यावर मी लक्ष देत नाही. मला फक्त या गोष्टीची काळजी आहे की, माझा मुलगा, माझी फॅमिली, माझा पार्टनर माझे मित्र काय विचार करतात. मी आधी काम करायचे आणि माझ्या मुलालाही सांभाळायचे आणि आताही तसंच आहे.”

पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्या, कारण …

पावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचे अनेक फायदे

पावसाळ्यात येणारी ‘ही’ भाजी आहे सर्वात पौष्टिक ; खा आणि रोगमुक्त व्हा

पावसाळ्यात माशांमुळे पसरू शकते रोगराई, असा टाळा उपद्रव

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

य़ेरवडा कारागृहात टोळीयुद्ध जोमात, नक्की चाललंय तरी काय ?

महाआघाडीच्या अडचणीत वाढ,वंचितनंतर ‘हा’ पक्षही देणार धक्का ?

Loading...
You might also like