मुलगा अरहानसोबत क्रिकेट खेळताना दिसली मलायका अरोरा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची हॉट अ‍ॅक्ट्रेस मलायका अरोरा (Malaika Arora) हॉटनेससाठी फेमस आहे. सोशल मीडियावर मलायकाचे हॉट फोटो कायमच धुमाकूळ घालत असतात. पुन्हा एकदा मलायका अरोरा आपल्या काही फोटोंमुळं चर्चेत आली आहे. यावेळी मलायका काही वेगळ्याच अंदाजात दिसली आहे. समोर आलेल्या फोटोत मलायका तिचा आणि अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan) चा मुलगा अरहान खान (Arhaan Khan) सोबत क्रिकेट खेळताना दिसत आहे. यात ती बॅटिंग करतानाही दिसत आहे.

मलायकाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. याचे काही व्हिडिओदेखील सोशलवर व्हायरल झाले होते, ज्यात ती शॉट मारण्याचा प्रयत्न करताना दिसत होती. यावेळी तिथं कुत्रंही दिसत आहे जे मलायकानं टोलवलेला बॉल तोंडात पकडून आणून देताना दिसत आहे.

मलायकानं मुलगा अरहानसोबत क्रिकेटचा खूपच आनंद घेतला. इतकंच नाही तर काही फोटोंमध्ये मलायका मुलासोबत बॅडमिंटन खेळतानाही दिसत आहे. सध्या तिचे हे फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

46 वर्षांची मलायका आजही खूपच यंग दिसते. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ती खूप मेहनत घेत असते. या वयातही मलायका कमालीची हॉट आणि सेक्सी दिसते. भल्या भल्या अभिनेत्री तिच्या हॉटनेसपुढे फिक्या दिसतात. मलायका आपला बॉयफ्रेंड अर्जुन कपूरमुळेही चर्चेत असते. आता त्या दोघांनीही आपलं नातं ऑफिशियल केलं आहे.

मलायकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या ती सिनेमांपासून दूर आहे. आजवर मलायकानं अनेक सिनेमात आयटम नंबर केले आहेत, जे खूप गाजले आहेत.