आई मलायका आणि अभिनेता अर्जुन कपूरच्या संबंधाबाबत मुलगा अरहानची पहिली ‘प्रतिक्रिया’

मुंबई : वृत्तसंस्था – सध्या अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्या अफेअरची चर्चा जोरदार सुरु आहे. नुकत्याच न्यूयार्क वेकेशन दरम्यान या दोघांचा फोटो व्हायरल झाला होता. अर्जून कपूरने या वेकेशनमध्ये फोटोंद्व्रारे आपले प्रेम जाहिर केले होते. एका मुलाखतीत मलायका आणि अर्जुन यांनी आपल्या नात्याविषयी चर्चा केली. या मुलाखतीत त्यांनी दोघांच्या वयामध्ये असलेले अंतर यावर सुद्धा चर्चा केली.

एका मुलाखतीत मलायकाने सांगितले की, घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम मिळवणे तिच्यासाठी खूप मुश्किल आहे. तिने असे ही सांगितले की, ‘ही खूप छान फिलिंग आहे. माझे लग्न तुटत होते तेव्हा मला माहित नव्हते की, मला दूसऱ्या नात्यामध्ये जायचे आहे की नाही ? पण माझी अशी इच्छा होती की, मी स्वतःला पुन्हा एकदा एक संधी द्यावी. मला आनंद आहे की, मी चांगला निर्णय घेतला.’

या मुलाखतीमध्ये अभिनेत्री मलायकाने तिच्या आणि अर्जुन यांच्या वयामधील अंतर यावर पडलेल्या प्रश्नावर देखील उत्तर दिले. ती म्हणाली की, ‘कोणत्या नात्यामध्ये वयाच्या अंतरामुळे काहीच फरक पडत नाही. ही दोघांमधील फिलिंग आणि कनेक्शनची गोष्ट असते. ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे की ज्या सोसायटीमध्ये आम्ही राहतो तेथील लोक आम्हाला पुढे जाऊ देत नाही. जे लोक असे बोलतात त्यांना मला सांगायचे आहे की, आप भाड़ में जाइए.’

अभिनेत्री मलायकाने या मुलाखतीत सांगितले की, तिने तिच्या आणि अर्जुनच्या नात्याविषयी आपला मुलगा अरहान याच्याशी देखील चर्चा केली आहे. अरहान त्यांच्या नात्याबद्दल खूप खुश आहे. याआधी मलायकाने अर्जून कपूरच्या बर्थडेला दोघांचा एक फोटो शेअर करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या होत्या. या फोटोमध्ये मलायकाने अर्जुनचा हात पकडला आहे.


आरोग्यविषयक वृत्त –

लहान मुलांच्या आरोग्यासाठी ‘घोळ मासा’ फायदेशीर 

सकाळी लवकर उठणाऱ्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी ? 

ब्रश केल्यानंतरही तोंडाची दुर्गंधी येते का ? ही असू शकतात कारणे 

आश्चर्यच ! आता पोटातील गॅस बाहेर पडताच दुर्गंधी ऐवजी दरवळेल सुगंध