Video : आता ‘या’ प्रकारे केलं जातं मेकअप अन् शुटींग, मलायका अरोरानं शेअर केला व्हिडीओ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार मलायका अरोरा हिनं तिची शुटींग सुरू झाल्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. आता कशा पद्धतीनं शुटींग केली जाते याची सर्व प्रोसेस व्हिडीओत दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मलायकानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात आता शुटींग कशी केली जाते हे पाहायला मिळत आहे. व्हिडीओत दिसत आहे की, आधी तर तिचं सगळं सामान सॅनिटाईज होत आहे. नंतर ती सेटवर जाते. तिथं तिलाही सॅनिटाईज केलं जात आहे. मेकअप ओबीमध्येही आर्टीस्ट मास्क किंवा पीपीई किट घालून दिसत आहेत. तिनंही मास्क लावल्याचं दिसत आहे.

व्हिडीओत पुढं दिसत आहे की, मलायका पूर्णपणे रेडी झाल्यानंतर मास्क लावते. लोकांना सेटवर चालताना सोशल डिस्टेंसिंगचं मार्किंगही देण्यात आलं आहे त्यावरूनच ते चालत आहेत. नंतर ती स्टेजवर जाते आणि शुटींगचा हिस्सा बनते. सोबतच तिनं या लुकमधील काही फोटोही शेअर केले आहेत जे सोशलवर चर्चेत आहेत.

मलायकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या ती सिनेमांपासून दूर आहे. आजवर मलायकानं अनेक सिनेमात आयटम नंबर केले आहेत जे खूप गाजले आहेत.