home page top 1

Video : मलायका अरोरा मुलांसोबत वागली ‘अशी’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कधी आपल्या बोल्ड फोटोंनी तर कधी अर्जुन कपूर सोबत नात्यामुळे नेहमीच चर्चेता हिस्सा बनणारी अभिनेत्री मलायका अरोरा नुकतीच एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. या व्हिडीओमुळे मलायका चांगलीच ट्रोल होताना दिसत आहे. व्हिडीओ मुलांसोबत मलायका ज्या पद्धतीने वागली आहे ते लोकांना आवडले नाही असे दिसत आहे. यामुळेच लोकांनी तिला प्रचंड ट्रोल केले आहे. काही लोक मलायकाला फेक म्हणत आहेत. तर काही लोक तिच्या वागणुकीला उद्धट म्हणत आहेत. सध्या मलायकाचा हा व्हिडीओ सोशलवर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

या व्हिडीओत दिसत आहे की, रेस्टॉरंटच्या बाहेर काही मुलं मलायकासोबत फोटो काढण्यासाठी आले आहेत. त्यांच्यासोबत एक महिलाही दिसत आहे. मलायका येताच ती मुलांच्या खांद्यावर हात ठेवत स्माईल करत पोज देत आहे. फोटो काढून होतो आणि मलायका लगेचच ती तिथून निघून जाते. तिचं हे वागणं खूपच उद्धट असल्याचं दिसतंय. मुलं तिला बाय बोलत आहेत. परंतु मलायका बाय न बोलताच तशीच निघून जाताना दिसते. मुलांकडे ती साध पहातही नाही. मलायकाचं हेच वागणं लोकांना आवडलं नाही. लोकांनी तिला प्रचंड ट्रोल केलं.

एका युजरने मलायकाला ट्रोल करताना म्हटले आहे की, “खूपच खराब ट्रीटमेंट. फक्त फोटोग्राफर्ससाठी स्माईल करत आहे आणि फेक पोज देत आहे. मला कळत नाही लोक अशा अॅक्ट्रेसला का भाव देतात.” आणखी एक युजर म्हणतो की, “फोटो क्लिक केल्यानंतर मलायका कशी पळाली…” आणखी एक युजर म्हणतो की, “फोटोग्राफर्ससाठी स्माईल करत आहे. नंतर ती मुलांकडे एकदाही पहात नाही. किती मतलबी आहे.”

याआधीही मलायका तिच्या कपड्यांमुळे आणि बोल्ड फोटोंमुळे अनेकदा ट्रोल झाली आहे.

Loading...
You might also like