‘या’ अभिनेत्रीकडे ‘कॉम्प्रोमाइज’ करण्याची ‘डिमांड’ करत होता ‘हा’ प्रोड्यूसर, शोमध्ये केला खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये मागील वर्षी मीटूच्या प्रकरणचा प्रभाव खूप दिसला. यामुळे अनेक मोठ्या चित्रपटामधून कलाकारांवर महिलांच्या शोषणाचा आरोप लावला गेला. आता याचा प्रभाव मल्याळम चित्रपट इंडस्ट्रीवर देखील दिसू लागला आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री गायत्री सुरेश हीने सांगितले की, तिला एका प्रोड्यूसरने कॉम्प्रोमाइज करायला सांगितले होते.

एका मुलाखतीत चर्चा करताना गायत्रीने सांगितले की, कशाप्रकारे तिला एकदा कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता. तिने सांगितले की, करिअरच्या सुरुवातीच्या दिवसात तिला चित्रपटात काम देण्याच्या बदल्यात प्रोड्यूसरने चुकीची मागणी केली होती.

गायत्रीने सांगितले की, ‘तो मला मेसेज करुन विचारत होता की, तुम्ही तयार आहात का ? जेव्हा मी त्याला नकार दिला. तेव्हापासून मी त्याच्याशी बोलणे बंद केले. त्यामुळे कामाशिवाय आमचे काही बोलणे होत नव्हते.’

गायत्रीच्या आधी मल्याळम अभिनेत्री पार्वतीने देखील या गोष्टीचा खुलासा केला होता. तिला करिअरच्या सुरुवातीला खूप ऑफर्स मिळाले होते. पण तिला नकार द्यावा लागला. कारण प्रोड्यूसर तिला काम करण्याच्या बदल्यात कॉम्प्रोमाइज करण्यासाठी म्हणत होता. मागच्या वर्षी मीटूला घेऊन अलोक नाथ, साजिद खान, राजकुमार हिरानी अशा अनेक कलाकारांवर महिलांनी आरोप लावले होते. यामुळे अनेक कलाकार बॉलिवूडपासून दूर गेले होते.

सिनेजगत

मुंबईतील पावसाचा बॉलिवूडवर देखील ‘इम्पॅक्ट’, ‘या’ चित्रपटासह इतरांना ‘फटका’

जायरा वसीमसारखे अजिबात नाहीत ‘या’ ‘टॉप’ ४ बालिवूड अभिनेत्रींचे ‘विचार’

Video : अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत ‘बोल्ड’ सीन करताना ‘हा’ अभिनेता ‘आऊट ऑफ कंट्रोल’ !

बहुजननामा

अनुसूचित जातीमध्ये १७ ओबीसी जाती समाविष्ट करण्याचा योगी सरकारचा निर्णय बेकायदा

आगामी विधानसभेसाठी वंचित-काँग्रेस एकत्र आल्यास समीकरणे बदलतील

शहरातील सर्व बांधकामे तातडीने थांबवा – बाबा आढाव