अभिनेत्री माल्वी मल्होत्राला मिळतेय जिवे मारण्याची धमकी ! आधी झाला होता जीवघेणा हल्ला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीव्ही अ‍ॅक्ट्रेस माल्वी मल्होत्रा (Malvi Malhotra) हिच्यावर जवळपास एका महिन्यापूर्वी जीवघेणा हल्ला झाला होता. यात माल्वी गंभीर जखमी झाली होती. हल्ल्यानंतर आरोपीला ताब्यात घेतलं असलं तरीही माल्वीच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. अ‍ॅक्ट्रेसनं सांगितलं आहे की, तिला आणि तिच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी मिळत आहे. 18 नोव्हेंबर रोजी एका व्यक्तीनं बाईकवर येऊन तिला धमकी दिल्याचं तिनं सांगितलं आहे.

एका वृत्तपत्रासोबत बोलताना माल्वीनं सांगितलं की, 18 नोव्हेंबर रोजी मी माझ्या पॅरेंट्ससोबत बिल्डिंग कंपाउंडमध्ये वॉकसाठी गेले होते. बाईकवर मास्क परिधान केलेला एक माणूस माझ्याकडे आला. माझ्या वडिलांवर ओरडत तो म्हणाला, योगेशला लवकरच जामीन मिळेल. त्यानंतर आम्ही दाखवू तुमच्यासोबत काय काय होऊ शकतं. यानंतर मला झोपही येत नाही. मी लवकरच घर बदलण्याबद्दल विचार करत आहे.

तिनं सांगितलं की, तिला अद्यापही पूर्ण बरं वाटत नाही. मला रेग्युलर मेडिकल चेकअपसाठी जावं लागतं, असंही तिनं सांगितलं आहे.

गेल्या महिन्यात माल्वी मल्होत्रावर मुंबईतील अंधेरीमध्ये जीवघेणा हल्ला झाला होता. योगेश महिपाल सिंह असं हल्ला करणाऱ्या युवकाचं नाव असल्याचं सांगितलं जात आहे. महिपाल अ‍ॅक्ट्रेसवर लग्नासाठी दबाव टाकत होता. जेव्हा माल्वीनं यासाठी नकार दिला, तेव्हा त्यानं माल्वीच्या हाथावर चाकूने वार केले आणि पळ काढला. कोकिलाबेन रुग्णालयात माल्वीवर उपचार सुरू होते. बोट कापल्यानं तिला एक सर्जरीही करावी लागली.

You might also like