मानुषी छिल्लरची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, अक्षय कुमारसोबत ‘या’ चित्रपटात झळकणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विश्वसुंदरीचे किताब पटकवणारी अभिनेत्री मानुषी छिल्लर चंदेरी दुनियात पाऊल ठेवण्यास सज्ज झाली आहे. ती दोन वर्षेआधी मिस वर्ल्ड झाली होती. तेव्हापासून सगळे याची वाट पाहत आहे की, कधी ती बॉलिवूडमध्ये पाऊल टाकेल. मानुषी छिल्लरची चर्चा खुप पसरत आहे, असे समजले जाते की, मानुषी ही फराहच्या आगामी चित्रपटात दिसून येईल. सध्या मानुषी ही अभिनेता अक्षय कुमारसोबत एका बायोपिक चित्रपटामध्ये पदार्पण करणार आहे. ती सध्या चित्रपटात काम करण्यासाठी खुप उत्सुक आहे.

एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर हे शूरवीर पृथ्वीराज चौहान यांच्यावर आधारीत बायोपिकमध्ये एकत्र काम करणार आहेत. याच वर्षी चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात होणार आहे. पृथ्वीराज चौहानचा हा चित्रपट चंद्रप्रकाश द्धिवेदी डायरेक्ट करणार आहे. त्याचबरोबर चित्रपटाची निर्मिती यशराज बॅनर करणार आहे.

मानुषी छिल्लर या चित्रपटात राजकुमारी संयुक्ताची भूमिका साकारताना दिसणार आहे. काही दिवसांपुर्वी मानुषी तिच्या ग्रॅंड लॉंन्चच्या तयारीमध्ये व्यस्त होती. ती अभिनय आणि नृत्याची कार्यशाळा घेत आहे. त्याचबरोबर चित्रपटाची तयारी देखील करत आहे. एक वेगळी प्रेमकथा चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. मानुषी छिल्लर हिने वर्ल्डचा किताब पटकवण्याआधी हरियाणामध्ये ५४ वी फेमिना मिस वर्ल्ड २०१७ चा किताब पटकावला होता.