उर्मिला मातोंडकरचा गौप्यस्फोट ! बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना ‘या’ शब्दात हिणवलं जातं

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना काय संबोधलं जातं याबद्दल बॉलिवूडमधील प्रसिद्ध मराठी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिनं गोप्यस्फोट केला आहे. बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना मराठी म्हणून नव्हे तर घाटी म्हणून संबोधलं जातं असं उर्मिला म्हणाली आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ती बोलत होती.

उर्मिला म्हणाली, “बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना मराठी म्हणून नव्हे तर घाटी म्हणून संबोधलं जातं. घाटी लोगों को हिंदी भी नहीं आती. ये क्या घाटी कपडा पहना है. उनके हिंदी को घाटी बदबू आ रही है असं हिणवलं जातं. बॉलिवूडमध्ये ही वस्तूस्थिती यापूर्वीही होती आणि आताही आहे.” असं तिनं सांगितलं आहे.

कंगना रणौतवर साधला निशाणा

यावेळी बोलताना उर्मिलानं कंगना वादावरही भाष्य केलं. ती म्हणाली, “या मॅडमला वाय प्लस दर्जाची सुरक्षणा पुरवण्यात आली यांचे पैसे कोण देतंय. तिनं क्लेम केला होता की, तिच्याकडे माफियांची नावं आहेत आणि ती तिला नार्कोटीक्स डिपार्टमेंटकडे द्यायची आहेत. या कारणानं तिनं सुरक्षा तर मागितली परंतु तिला जर नावं द्यायचीच होती तर तिनं मेलवरून किंवा टेक्नॉलॉजीचा वापर करून ती नावं द्यायला हवी होती. त्यासाठी इथं येण्याची काय गरज होती. ती चिथवण्यासाठीच इथं आली होती. तिनं नावं दिली का ? त्यातून काय झालं का ? ज्या इंडस्ट्रीनं तुम्हाला घडवलं तिला तुम्ही बदनाम करता. ही घाण आहे असंही ती म्हणाली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like