पाकिस्तानमध्ये प्रोग्राम केल्यानं ‘थु-थु’ झाल्यानंतर मीका सिंहचं भारतात परतताच ‘भारत माता की जय’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील काही दिवसांपासून गायक मिका सिंग हा चर्चेत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या मोठ्या तणावानंतर देखील त्याने पाकिस्तानमध्ये जाऊन स्टेज शो केला होता. त्यानंतर त्याला चित्रपटांशी संबंधित अनेक संस्थांनी प्रतिबंध केला आहे. त्याचबरोबर त्याला सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर देखील त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आता त्याने इंस्टाग्रामवर दोन व्हिडीओ अपलोड करून आपल्या देशभक्तीचा परिचय देण्याचा प्रयत्न केला आहे.

एका व्हिडिओमध्ये त्याने महाराष्ट्रात आलेल्या पुरातील पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो भारतीय जवानांसोबत स्वतंत्रता दिवसाचे सेलिब्रेशन करताना दिसून येत आहे. त्याचबरोबर समोर असलेल्या लोकांकडे पाहून ‘भारत माता कि जय’ अशा प्रकारच्या घोषणा करताना देखील आढळून येत आहे. त्यामुळे तो आपण देशभक्त असल्याचा एकीकडे प्रयत्न करताना दिसून येत आहे तर दुसरीकडे तो जागरूक नागरिक असल्याचे देखील दाखवत आहे.

दरम्यान, मिका सिंगने हे व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर अनेक नागरिकांनी आणि नेटिझन्सनी यावर प्रतिकिया देत आपली मते मांडली आहेत. त्यामुळे आता मिका सिंग आपल्या पाकिस्तानमधील कार्यक्रमाविषयी केव्हा भाष्य करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like