लाईफ पार्टनर वयानं लहान असेल तर ‘लॉयल्टी’मध्ये फरक पडतो का ? ‘रिलेशनशिपचा अर्थ सेक्स नाही’ असं सांगत मिलिंद सोमन म्हणाला…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार, फिटनेस फ्रिक आणि पहिला पुरुष सुपरमॉडेल म्हणून ओळखला जाणारा मिलिंद सोमन (Milind Soman) आणि त्याची पत्नी मॉडेल अंकिता कोंवर (Ankita Konwar) लग्न झाल्यानंतर सतत चर्चेत येत आहेत. दोघांनाही फिरायला खूप आवडतं. अनेकदा आपल्या हॉट केमिस्ट्रीमुळंही ते चर्चेत राहिले आहे. दोघांच्या वयातील गॅपही अनेकदा चर्चेत येण्याचं कारण ठरला आहे. जेव्हा मिलिंदनं अंकिता सोबत लग्न केलं तेव्हा 52 वर्षांचा होता आणि ती 26 वर्षांची होती. दोघांच्या वयात 26 वर्षांचं अंतर आहे. अलीकडेच त्यानं रिलेशनशिपच्या त्याच्या दृष्टीकोनाबद्दल सांगितलं आहे. वयाच्या गॅपबद्दलही तो बोलला आहे.

एका मुलाखतीत बोलताना मिलिंदला प्रश्न विचारण्यात आला की, लहान वयाची लाईफ पार्टनर असल्यानं तुमच्यासोबत लॉयल होण्यात म्हणजेच एकनिष्ठ राहण्यात काही फरक पडतो का ? यावर त्यानं भाष्य केलं आहे. त्याचं उत्तर ऐकून अंकितालाही प्राऊड वाटलं असेल.

मिलिंदनं त्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की, एकनिष्ठता (लॉयल्टी) थेट आपल्या विचार आणि समजून घेण्यावर अवलंबून आहे. याचा सेक्स लाईफशी काहीही संबंध नाही. तुमच्यासाठी जास्त महत्त्वाचं काय आहे यावर अवलंबून आहे.

पुढं बोलताना मिलिंद म्हणाला, रिलेशनशिपचा अर्थ सेक्स नाही होत. याचा अर्थ नातं मजबूत असणं आहे ज्यामुळं आपण समाधानी असाल. क्लोजनेस गरजेचा आहे, शेअर करणं गरजेचं आहे. जर तुमच्या नात्यात हे नसेल तर हे नातं नाहीये.

मिलिंद म्हणाला, तुमच्यात चांगलं फिजिकल रिलेशनशिप आहे याचा अर्थ असा नाही की, ते नातं आहे. मला वाटतं लोकं तेव्हाच आपल्या पार्टनरपासून दूर जातात जेव्हा त्यांना इमोशनल सपोर्ट मिळत नाही जो ते डिझर्व करतात.

53 वर्षीय फिटनेस फ्रिक मिलिंद सोमननं 22 एप्रिल 2018 रोजी त्याच्याहून 26 वर्षंनी लहान असणाऱ्या मॉडेल अंकिता कोंवरशी लग्न केलं. त्यांच्यातील एज गॅपमुळे हे कपल अनेकदा चर्चेत आलं आहे आणि ट्रोल झालं आहे. परंतु त्यांना याचा काहीही फरक पडत नाही. त्यांचे अनेक फोटो व्हिडीओ समोर येत असतात आणि व्हायरल होताना दिसत असतात.