वयाच्या १० च्या वर्षी RSS च्या शाखेत जायचा मिलिंद सोमण, ट्रोल झाल्यावर घेतली अशी ‘मजा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चित्रपट अभिनेता मिलिंद सोमण याने आपल्या चरित्रात खुलासा करताना म्हटले की, १० वर्षाचा असताना वडिलांच्या सांगण्यावरून तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जात असत. त्याचा खुलासा झाल्यानंतर तो सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड करत आहे. यातील काही लोकांनी त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्नही केला आहे. दरम्यान, यावर मिलिंद सोमण याने आपल्या स्टाईलमध्ये मजा घेतली.

मुंबईतील शिवाजी पार्क येथील स्थानिक शाखेत जाण्याचा आपला अनुभव सोमण याने सांगितला. त्याने लिहिले की, त्याच्या वडिलांचा नेहमी विश्वास होता कि, एक तरुण म्हणून मिलिंद हा शिस्तबद्ध जीवन, चांगली शारीरिक क्षमता आणि योग्य विचारसरणीसाठी आणि देशाची सेवा करण्यासाठी आरएसएसच्या कनिष्ठ कार्यकर्त्यांमध्ये सामील होईल.

मिलिंद सोमणने पुढे लिहिलं की, जेव्हा तो वृत्तपत्रांत आरएसएसबद्दल लिहिलेलं वाचतो, तेव्हा माध्यम त्यांना कशासाठी तरी जबाबदार धरते. शाखेशी संबंधित त्याच्या आठवणी पूर्णपणे वेगळ्या आहेत. या संस्मरणात सोमण पुढे लिहितो की त्याचे वडील स्वत: आरएसएसचे स्वयंसेवक होते आणि त्यांना हिंदू असल्याचा अभिमान होता. यानंतर मिलिंदने सोशल मीडियावर ट्रेंड करण्यास सुरवात केली.

यापैकी काहींनी त्याला ट्रोलही केले. यासाठी त्याने ट्रोलर्सची मजा घेत म्हटले की, ‘मी वयाच्या 54 व्या वर्षी दहा वर्षांच्या वयात आलेल्या अनुभवासाठी ट्रेंड करीत आहे. कदाचित हा कल पोहोण्यासाठी देखील असता, जे मी त्यावेळीही करत होतो ! ” दरम्यान, मिलिंद तंदुरुस्तीसाठीही ओळखला जातो. त्याने बऱ्याचदा अनेक किलोमीटर धावण्याचा विक्रम केला आहे.