लग्नाच्या 5 वर्षानंतर पती ‘रायन’पासून दूर राहतेय मिनिषा लांबा, झाला घटस्फोट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री मिनीषा लांबाच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एक धक्कादायक बातमी पुढे येत आहे. मिनीशा लांबा आणि तिचा नवरा रायन थाम यांचा घटस्फोट झाला आहे. 2018 पासून, मिनीषा आणि तिचा नवरा वेगळे राहत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या, मात्र मिनीषाने या संदर्भात कधीही विधान केले नाही. यादरम्यान माध्यमांनी तिच्याशी बर्‍याचदा बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र मिनिषाने याबाबत मौन बाळगले.

मिनीषाने इतके दिवस ना कोणते विधान केले, ना तिचे विवाहित जीवन चांगले नाही हे दर्शवण्यासाठी तिने सोशल मीडियावर कोणतेही पोस्ट शेअर केली. पण आता मिनीषाने या वृत्ताला दुजोरा दिला असून ती आणि रायन विभक्त झाल्याची पुष्टी केली आहे. एका मुलाखती दरम्यान मिनिषा म्हणाली, “हो, मी आणि रायन एकमेकांपासून विभक्त झालो आहोत.” कायदेशीर कारवाईही पूर्ण झाली आहे ‘.

दरम्यान, मिनीषा आणि रायन यांची 2013 मध्ये जुहूमधील नाईटक्लब येथे भेट झाली होती. यानंतर दोघेही प्रेमात पडले आणि दोन वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केले. 6 जुलै 2015 रोजी या दोघांनी लग्न केले. या दोघांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, रायन रेस्ट्रो मालक आहे आणि मिनिषा एक अभिनेत्री आहे. दरम्यान, मिनिषा बऱ्याच काळापासून बॉलिवूडपासून दूर आहेत.

2005 मध्ये आलेल्या ‘ यहां ‘ या चित्रपटातून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर ती 2007 साली ‘हनीमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड’ चित्रपटात दिसली. त्यानंतर या अभिनेत्रीने ‘दस कहानी’, ‘किडनॅप’ आणि ‘ बचना-ऐ-हसीनों ‘ सारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले. मात्र, या चित्रपटांनंतर मिनीषी कोणत्याही चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून दिसली नाहीत. वर्ष 2018 मध्ये ती टीव्ही सीरियल ‘इंटरनेट वाला लव’ मध्येही दिसली होती.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like